जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांचे कौतुक
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : महाप्रबोधन यात्रेच्या (Maha Prabodhan Yatra) समारोपाची बीड येथील सभा यशस्वीरित्या पार पडली. जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन सभेचा अहवाल सादर केला.
महाप्रबोधन यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना विरोधकांनी बीड येथील सभा फेल व्हावी म्हणून व्यूह रचना आखली होती. सभा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांची नाचक्की झाली. दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या सांगता सभेची जबाबदारी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्यावर येऊन ठेपली होती. मात्र अनुभवी जगताप यांनी नव्या-जुन्या शिवसैनिकांची मोट बांधत सभा यशस्वी करून दाखवत विरोधकांच्या तोंडावर सणसणीत चपराक लगावली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील जिल्हा व राज्यातील नेत्यांनी केलेले सर्व दावे गळून पडले. सभेला अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी होती. जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी मुंबई येथील मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून सभेचा अहवाल सादर केला.
यावेळी शिवसेना नेते सुभाषजी देसाई साहेब, शिवसेना सचिव तथा खासदार विनायकजी राऊत साहेब, शिवसेना सचिव तथा खासदार अनिलजी देसाई साहेब, शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद आमदार सुनिलजी प्रभु साहेब, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब, हर्षलजी प्रधान साहेब उपस्थित होते.