250 जनांना मिळाला लाभ
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी अल खैर फाऊंडेशन जी मेडिकल क्षेत्रात, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात लोकांची मदत करत आहे. त्यामध्ये प्रत्येक महिन्याला 90 गरीब घरांना फूड किट(अन्न धान्य) वाटप करते तसेच अल खैर चॅरिटेबल क्लिनिक मागील तीन वर्षांपासून चालू आहे . फक्त 40 रुपयात चेकअप आणि औषधे मोफत देतात अशी खूप पुण्याचे काम करीत आहे. अशीच शिक्षणात सुद्धा कोणी गरीब मागे राहू नये म्हणून गरजूंना शालेय दप्तर, वह्या, पेन, पट्टी ,पेन्सिल, रबर, शॉपनर इत्यादी वस्तू देण्यात आले.
आज अल खैर फाऊंडेशने इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व अल खैर फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या पोलिस भरती पूर्व प्रशिक्षणातील पोलीस दलात लागलेल्या 11 पोलीसांचा सत्कार करण्यात आला व बीड जिल्ह्यातील 250 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करन्याचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. अँड अझहर अली होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शेख रशीद ( API), काझी मकदूम सहाब, शेख अखिल सर, अब्दुल खालेक साहेब, उमेर सलीम सर, डॉ सिराज खान सर, मुदस्सीर अन्सारी साहेब, डॉ इम्रान खान सर, अंकुश पवार सर, डॉ शकील सर, सय्यद वासिम सर, अल खैर फाऊंडेशनचे अध्यक्ष इनामदार अझहर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नजीब सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अझहर सर यांनी केले.