वायंदेशी, मुस्लिम उंटवाले, तांबटकर, कलईकर समाजाच्या स्थिती पाहणीसाठी थेट क्षेत्र भेट
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्र राज्य मागास आयोगाचे सदस्य प्रा.डॉ. गोविंद काळे आणि प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) यांनी जिल्ह्यातील वायंदेशी व मुस्लिम उंटवाले मागास जातीबाबत स्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील तांडा वस्ती सुधार योजना , निवासी आश्रम शाळा, कन्यादान योजना अशा योजनांची कार्यवाही या समाजाच्या प्रगतीसाठी व्हावी. यासाठी महत्वपूर्ण सूचना केल्या.
याप्रसंगी या जातीसाठी शासनाच्या विविध योजना ची होणारी अंमलबजावणी त्यातील अडचणी व कार्यवाही बाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या .कन्यादान योजनेसाठी शासन स्तरावरून मोठा निधी उपलब्ध केल्या जात आहे. तांडे वस्त्या व पालांवरती राहणाऱ्या या भटक्या विमुक्त मागास समाजातील व्यक्तींपर्यंत याची माहिती व लाभ पोहोचविला जावा अशा सूचना महाराष्ट्र राज्य आयोगाच्या सदस्यांनी आज केल्या. शासकीय विश्रामगृह बीड येथे यावेळी संशोधन अधिकारी मेघराज भाटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त श्रीमती एस. आर. मकरंद , समाज कल्याण विभागाचे लेखाधिकारी श्री खाडे तसेच आश्रम शाळा कक्षाचे श्री बारगजे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने एप्रिल 2021 पासूनच्या दाखल प्रकरणांबाबत आढावा सादर करण्यात आला या कालावधीत जवळपास 37 हजार 112 प्रकरणे समितीकडे दाखल झाले आहेत यामधील एप्रिल 2022 पासूनच्या एक वर्षात प्राप्त 16 हजार 887 प्रकरणापैकी 12562 निकाली काढण्यात आली आहेत अशी माहिती देण्यात आली.
जिल्ह्याच्या आष्टी, केज, परळी तालुक्यात विविध ठिकाणी क्षेत्र भेट
जिल्ह्यातील विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची क्षेत्र भेट तांबटकर, कलईकर , वायंदेशी या जाती समूहातील लोकांना मागास जातीमध्ये समावेश करून घेण्याबाबत आयोगाकडे या समुदायातील मागणीच्या अनुषंगाने मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी थेट लोकांचे प्रत्यक्ष म्हणणे ऐकले. यावेळी आयोगातील सदस्यांनी या प्रतिनिधीचे म्हणणे व्यवस्थित पणे ऐकले. यानंतर महाराष्ट राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ. गोविंद काळे आणि प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) यांनी केज शहरातील मुस्लीम उंटवाले तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी केली. यावेळी आयोगाचे सदस्य म्हणून प्रा. काळे , प्रा. डॉ. सरब( लताडे ), संशोधन अधिकारी मेघराज भाटे, सहाय्यक लेखाधिकारी खाडे , गटविकास अधिकारी परळी संजय केंद्रे, सिरसाळ्यातील सरपंच शेख असे उपास्थित होते.
तांबटकरी, कलईकर समाजाच्या थेट भेट
ही मुस्लिम जात गावोगावी जाऊन भटकांती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत ,या जनसूनवणीमध्ये चर्चा आयोजित करण्यात आले.यामध्ये समाजाच्या वतीने मनसब भाई तम्बटकर यांनी आयोगासमोर म्हणणे मांडले. यामध्ये मोठया संख्येने जनसमुदाय होता. यावेळी शेख मनसब भाई तांबटकर ,शेख रहीम तांबटकर ,लाला तांबटकर ,नसीर तांबटकर, सदेख तांबटकर, मलिक तांबटकर यांनी त्याच्या समाजाच्या समस्या आयोगासमोर मांडल्या.
सिरसाळ्यातील समुदायाच्या काही लोकांचे प्रत्यक्षात पाहणी करण्यात आली तर ते कश्या पद्धतिने काम करत आहेत याबद्धल ही राज्य आयोगाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.या वेळी वायंदेशी कुणबी सेवा संघ मराठवाडा बीड जिल्हा या संघटनेने ही या आयोगाला त्यांच्या मागण्यासाठी निवेदन दिले. अशोक मोरे बीड जिल्हा अध्यक्ष सह अशोक मोरे, मनोज फरके माजलगाव अश्या सह इतर लोकांचाही समावेश होता.