६७ लाभार्थाची तपासणी ; २२ लाभार्थी शत्रक्रियासाठी पात्र
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंबाजोगाई येथे दि.२ रोजी अंबाजोगाई येथे २-डी ईको तपासणी शिबीर मे लाड मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अंबाजोगाई येथे आयोजीत करण्यात आलेले होते. सदरील शिबीरा मध्ये अंबाजोगाई व परळी तालुक्यातील मिळुन (शाळा व अंगणवाडी) मधील एकुण ६७ लाभार्थी उपस्थित राहीलेले होते. त्यापैकि ६७ लाभार्थाची २- डी ईको तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४५ लाभार्थी सर्वसामान्य होते व शत्रक्रिया करणेसाठी २२ लाभार्थी पात्र झालेले आहेत.
जिल्हयात आरबीएसके कार्यक्रमातंर्गत एकुण ३९ वैद्यकिय पथके कार्यरत असुन सदरिल पथकामार्फत अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी वर्षातून दोन वेळेस व शाळेतील विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी एक वेळेस करण्यात येते. शाळेतील व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केल्या नंतर पुढील तपासणी करण्यासाठी वेगवेगळया आजारा करिता व विविध तपासण्या करिता उपजिल्हा ग्रामीण व जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येत असते.
अंबाजोगाई येथे दि.२ रोजी संपन्न शिबीरा करिता बालाजी हॉस्पिटल, भायखळा, मुंबई येथील प्रिडेंट्रीक कार्डीयोलॉजिस्ट डॉ. मंगेश निबांळकर, श्री प्रतिक मिश्रा सोशल वर्कर व त्यांचा स्टाफ उपस्थित होता. मा.जिल्हाधिकारी ,दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. ए. साबळे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेफ मा. निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं.) डॉ. राम आवाड यांच्या मार्गदशनाखाली सदर २- डी ईको शिबीर घेण्यात आले. सदर शिबीरा करिता ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथील वैद्यकिय अधिक्षक डॉ. रत्नाकर तांदळे सर व बालरोग तज्ञ डॉ. विजय लाड सर उपस्थित होते.
तसेच २-डी ईको तपासणी शिबीराचे विशेष नियोजन करणसाठी श्री. आर के तांगडे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक) यांनी मोलाचे परिश्रम घेतले. तसेच अंबाजोगाई तालुक्यातील आरबीएसके अंतर्गत वैद्यकिय अधिकारी डॉ. महेंद्र लोमटे, डॉ डॉ प्रदिप देशमुख, डॉ. कमलाकर साखरे,डॉ. सारीका बारहाते, डॉ. स्वाती जावळे, डॉ पुजा राजमाने, श्री राहुल शिंदे,नागेश चव्हाण,अमर गालफाडे, श्रीमती सोनाली माने, श्रीमती कामिनी केंद्रे, श्रीमती प्रतिभा परळकर, श्रीमती सोनाली सरवदे व श्रीमती विजया खरटमल यांनी सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सदरील २२ लाभार्थ्याच्या शस्त्रक्रिया महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजने तर्गत बालाजी हॉस्पिटल, भायखळा, मुंबई येथे पुढील महिन्यात करण्यात येणार आहेत. तसेच लकांच्या हृदय शस्त्रक्रिया हया माहे जुन २०२३ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.