– पत्नीने भावाच्या मदतीने काटा काढल्याचा संशयकेज
– तालुक्यातील आडस येथील घटना
By MahaTimes ऑनलाइन |
केज : तालुक्यातील आडस येथे शनिवारी सायंकाळी संशयास्पद अवस्थेत गावातील तरुणाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी रविवारी मयताच्या आईच्या त क्रारीवरून पत्नी व मेव्हण्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
माहिती अशी की, केज तालुक्यातील आडस येथील विकास शिवाजी भोसले ( वय 40 वर्ष ) हा सालगडी म्हणून काम करत होता. काल शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मानेवाडी रस्त्यावर बडगळा शिवारातील शेतळ्यात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार मयत विकास भोसले यास दारूचे वेसन होते. तो दररोज दारु पिऊन घरी येऊन पत्नी सोबत नेहमी भांडण व मारहाण करत असे, शुक्र वारी मी नातवांना भेटण्यासाठी गेले असता तेव्हाही विकास हा दारु पिऊन आला असल्याने त्याचा मेव्हणा सिध्देश्वर अशोक खडके हा त्याला मारहाण करत होता. त्यांची सोडवा सोडव केली.
यावेळी मेव्हण्याने दारु पिऊन माझ्या बहिणीला त्रास दिला तर तुला खल्लास करीन अशी धमकी दिली. याच रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पत्नी व मेव्हण्याने शेतात सोडून येतो म्हणून माझ्या मुलाला दुचाकीवर घेऊन गेले. आणि शनिवारी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. दारु च्या व्यसनाला व भांडणाला कंटाळून पत्नी व मेव्हण्याने खून केल्याची तक्रार मयताची आई द्रौपदी शिवाजी भोसले यांनी फिर्याद म्हटले आहे.
या फिर्यादीवरून धारु र पोलीस ठाण्यात आरोपी सिद्देश्वर अशोक खडके ( मेव्हणा ), नंदिनी विकास भोसले ( पत्नी ) या दोघां विरोधात कलम 302, 506,34 भा.दं.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करत आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
‘पीएम’ रिपोर्ट मध्ये गळा आवळल्याचे उघडकीस
रविवारी तसेच रात्री उशिरा सदरील मृतदेहाचे अंबाजोगाई येथील स्वाराती रु ग्णालयात शवविच्छेदन झाले. यामध्ये गळा आवळल्याने विकासचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला सल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.