जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांचे कौतुक
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : महाप्रबोधन यात्रेच्या (Maha Prabodhan Yatra) समारोपाची सभा मागील आठवडयात यशस्वीरित्या पार पडली. या सभेत खा. संजय राऊत (Sanjay Raut) व सुषमा अंधारे (Sushma Andhare) या शिवसेनेचे दोन बुलंद तोफा कडाडल्या. या सभेला तुफान गर्दी लोटली होती. जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी आज या सभेचा अहवाल मुंबई येथील सामना कार्यालयात खा. राऊत यांची भेट घेऊन सादर केला.
महाप्रबोधन यात्रा दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना विरोधकांनी बीड येथील सभा फेल व्हावी म्हणून व्यूह रचना आखली होती. मात्र, एक-दोन नेत्यांच्या जाण्याने शिवसैनिक व शिवसेना पक्षावर कांहीच फरक पडत नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील व जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पक्षविरोधी कार्यवाया केल्या. सभा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचीच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेतुन हकालपट्टी केली. यासह विरोधकांची नाचक्की झाली.
सत्ताधाऱ्याकडून बीड येथील सभेला विशेष लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अशा वेळी सांगता सभेत शिवसेने चे नेते खा. संजय राऊत व सुषमा अंधारे काय बोलतात आणि त्याला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सभा यशस्वीरित्या पार पडली. मात्र विरोधक यावरही शांत बसले नाही त्यांनी सभेला तुफान गर्दी असतांना सभा सुरू होण्यापुर्वीचे फोटो मिळवत या सभेला लोक जमले नाहीत, सभा फ्लॉप झाली, लोकांनी पाठ फिरवली… अशा अनेक प्रतिक्रि या देत केविलवाणी टिव..टिव करीत खोचक टीका केली होती. मात्र, फॅक्ट चेक मध्ये नितेश राणे, उदय सामंत यांच्यासह भाजप, शिंदे गटाचे पडले नेते तोंडघशी पडले.
दरम्यान, महाप्रबोधन यात्रेच्या सांगता सभेची जबाबदारी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्यावर येऊन ठेपली होती. मात्र अनुभवी जगताप यांनी नव्या-जुन्या शिवसैनिकांची मोट बांधत सभा यशस्वी करून दाखवत विरोधकांच्या तोंडावर सणसणीत चपराक लगावली. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षातील जिल्हा व राज्यातील नेत्यांनी केलेले सर्व दावे गळून पडले. सभेला अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी होती. आज जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनीमुंबई येथील सामना कार्यालयात खा. राऊत यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून सभेचा अहवाल सादर केला. यावेळी मा. न.प.सभापती सुनिल अनभुले, शिवसेना माजी शहरप्रमूख सुदर्शन धांडे उपस्थित होते.
आ. सुनिल प्रभु यांना अहवाल सादर
आज मुंबई येथे शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद आमदार श्री.सुनिलजी प्रभु साहेब यांची भेट घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी साहेबांचा सत्कार केला व महाप्रबोधन यात्रेचा संपूर्ण अहवाल सादर केला.