पन्नास वर्षाची चव ग्राहकांना पुन्हा चाखायला मिळणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : तब्बल ५० वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या आणि आपल्या चवीने बीडकरांना भुरळ घातलेल्या हॉटेल निलकमलच्या नुतनीकरण केलेल्या वास्तूचा आज मोठ्या थाटात शुभारंभ होत आहे. बीडच्या हॉटेल व्यवसायातील अग्रगण्य नाव म्हणून पाच दशकापासून निलकमल परिचित आहे. गेल्या पन्नास वर्षापासून गुणवत्ता आणि चव याची परंपरा निलकमलने राखली आहे. गेल्या तीन वर्षापासून हॉटेलचे काम सुरू होते. आता नव्या रूपात सौंदर्य घेवून हे हॉटेल ग्राहकांच्या सेवेत आजपासून दाखल होत आहे.

बीड शहरात १९७३ मध्ये हनुमानप्रसादजी मुंदडा यांनी हॉटेल निलकमलच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायाला सुरूवात केली होती. बीड शहरात एक अद्यावत असे हॉटेल या माध्यमातून सुरू झाले होते. तब्बल पाच दशके या हटिलने ग्राहकांच्या जीभेची चव पुरविली होती. आता दिनेश आणि राजेश मुंदडा हे दोघे या हॉटेल व्यवसायात लक्ष देत आहेत. तीन वर्षांपूर्वी नुतनीकरणासाठी हे हॉटेल बंद करण्यात आले होते. आता अगदी भव्य स्वरूपात निलकमलचे हॉटेल व्यवसायात पुनरागमन होत आहे.
मिटींग हॉल, रेस्टॉरंट, समारंभासाठी बँकेट हॉल यासह रुफ टॉफ रेस्टॉरंट आदी वेगवेगळ्या प्रकारांच्या माध्यमातून निलकमल ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज असून आज होत असलेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश मुंदडा आणि दिनेश मुंदडा यांनी केले आहे.
