बीड मधील महाप्रबोधन सभा ऐतिहासिक ठरली
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन हजार च्या नोटा चलनातून बाद केल्या. मात्र सर्वसामान्य लोकांचे खाण्याचे वांदे आहेत. या नोटा भाजप व शिंदे गटाकडे आढळतील असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रेचा समारोप शनिवारी बीडमध्ये झाला. यावेळी जाहीर सभेत संजय राऊत यांनी केंद्र सरकार, भाजपा व शिंदे गटावर टीकास्त्र साधले. यावेळी व्यासपीठावर उपनेत्या सुषमा अंधारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार बदामराव पंडित, शिवसेना नेते शेख निजाम, शाम धांडे, बाळासाहेब अंबुरे, गणेश वरेकर आदि सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींचा खरपुस समाचार घेतला. नरेंद्र मोदी हे एक नंबरचे फेकू आहेत. तुम्ही गुगलवर सर्च रून पहा. फेकू टाकलं की तुम्हाला मोदींचा फोटो आलेला दिसेल. ते भारताचे पंतप्रधान आहेत हे मोठं दुर्दवं असल्याचे राऊत म्हणाले. देशातील जनतेने फेकू चा चेहरा ओळखला आहे. गोरगरीबांना आनंदाचा शिधा तर, शिवसेना व महाराष्ट्र फोडणाºया त्या चाळीस चोरांना 50-50 कोटी रूपए दिले गेले. असे म्हणून त्यांनी भाजपा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह त्या आमदारावर निशाना साधला. कर्नाटक राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 37 सभा आणि 27 रोडशो करून देखील तेथील जनतेने त्यांचा दारु ण पराभव केला. राज्यातही अशीच परिस्थिती पहायला मिळणार आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी निवडणूकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा फोटो लावून निवडून यावे, मी राजकारण सोडतो अशी घोषणा खा. संजय राऊत यांनी बीडमध्ये जाहीर सभेतून केली.
गोपीनाथराव मुंडे नाहीत, तर भाजपदेखील इमानदार राहिली नाही -सुषमा अंधारे
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जिल्ह्यात ऊसतोड मजुरांचे अनेक प्रश्न आहेत. मुंडे साहेब हयात असताना शिवसेना-भाजपची युती होती. मात्र, आज गोपीनाथराव मुंडे राहिले नाहीत, त्यामळे भाजपदेखील इमानदार राहिली नाही. भाजपाची नेहमीच खेळी राहिलेली आहे. उपयुक्तता संपली की, ते माणसं सोडून देतात. हे राजकारण भाजपा नेहमीच करीत आलेले आहे. महाप्रबोधन यात्रेत आम्ही कोणावर टीका करत नाही. या यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न उपस्थित करत आहोत. राज्यात वाढ महागाईवर भाजप काहीच बोलत नाही. अनेक बेरोजगारांना काम देण्यासंदर्भात भाजप काहीच बोलत नाही. 400 रुपयांना मिळणारे गॅसचे सिलिंडर आज 1200 रुपयांपर्यंत गेले आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकारला हे दिसत नाही. आम्ही जेव्हा महागाई, रोजगारीवर प्रश्न उपस्थित करतो तेव्हा भाजपाचे नेते म्हणतात, हिंदू खतरे में है. डोळ्याला पाणी लावणारे हिंदुत्व आम्हाला नको, लोकांच्या डोळ्यांतील पाणी पुसणारे हिंदुत्व आम्हाला पाहिजे आहे. आम्हाला आनंदाचा शिधा नको, आमच्या महिलांना मोफत बस प्रवास नको, पण आम्हाला १२०० रुपयाला मिळणारे गॅस सिलिंडर ३०० रुपयाला देता का? असा सवाल उपस्थित करून भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. समाजातील अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारे हिंदुत्व आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले असल्याचे त्यांनी सांगून केंद्रातील भाजपचे सरकार केवळ थापा मारण्यात तरबेज असल्याची टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
जिल्हयात शिवसेनेची मोठी ताकद -अनिल जगताप
यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले, जिल्हयात शिवसेनेची ताकद मोठी होती, या जिल्ह्यातून एकेकाळी सहापैकी चार जागा शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत. आजही शिवसेनेला मानणारे शिवसैनिक जिल्ह्यात आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतून बीड जिल्ह्याला शिवसेनेसाठी तीन जागा द्या, अशी मागणी करून या यात्रेच्या निमित्ताने संजय राऊत बीड जिल्हयात यावेत, ही तमाम जिल्ह्यातील शिवसैनिकांची इच्छा होती. यापुढे जेव्हा तुम्ही जिल्ह्यात येताल तेव्हा नगरपालिका, पंचायत समिती, आपल्याच ताब्यात असेल, अशी ग्वाही जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी यावेळी दिली.
या महाप्रबोधन सभेसाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक बीड शहरात दाखल झाले होते.