सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे- अनिल जगताप
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाप्रबोधन यात्रेची आज, शनिवारी (दि. 20) बीड येथे शेवटची सभा होत असून या सभेला शिवसेना नेते खा. संजय राऊत, उपनेत्या सुषमाताई अंधारे, माजी मंत्री चंद्रकांत खैरे उपस्थित राहणार आहेत. सत्तासंघर्षानंतर बीड मध्ये होत असलेली ही पहिलीच सभा असुन शिवसेना नेते खा. संजय राऊत काय संदेश देणार याकडे राज्याचे लक्ष्य लागुन आहे.
या सभेसाठी जिल्हाभरातून किमान 10 हजारावर लोक उपस्थित राहतील, शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी ही यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ही सभा भव्य-दिव्य होण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत. सभेपुर्वी शहरात भव्य-दिव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे. ही रैली आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न समजुन घेण्यासाठी राज्यात महाप्रबोधन यात्रा काढण्यात आलेली आहे. सत्ता संघर्षानंतर बीड येथे पहिल्यांदाच महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभा होत असल्यामुळे नागरिकातच सभेबद्दल उत्सुकता असल्यामुळे सभा ऐतिहासिक ठरणार असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे.
Advt