यात्रा प्रचार प्रसंगी उपस्थित अशी विनंती केली
By MahaTimes ऑनलाइन |
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेच्या प्रचार सभेच्या प्रसंगी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे या निमित्त आज बीड शहरात विविध ठिकाणी जिल्हासंपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील, नूतन संचालक श्यामभाऊ पडुळे, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ पिंगळे, शिवसेना नेते शेख निजाम, शहरप्रमुख सुनील सुरवसे, वाहतूक सेनेचे मशरु भाई पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात कॉर्नर बैठका घेण्यात आल्या.
महाप्रबोधन यात्रेच्या प्रचारा निमित्त सर्वप्रथम महाराणा प्रताप आशा टॉकीज रोड येथे शिवसेनेचे रत्तन तात्या गुजर व उपशहर प्रमुख हनुमान बहिरवाल यांनी बैठक आयोजित केली व बशीर गंज येथे जेष्ठ नगरसेवक नरसिंग नाईकवाडे व जेष्ठ नेते मोईन मास्टर साहेब व गट नेते फारुख भाई पटेल यांच्या सोबत बैठक संपन्न झाली व कारंजा येथे व्यापारी संघटना बरोबर बैठक घेण्यात आली. नंतर पिंगळे गल्ली येथे माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे व बंडू भाऊ पिंगळे यांनी कॉर्नर बैठक घेऊन व मनशूर शहा स्कुल किल्ला रोड येथे अस्लम भाई अनवरी यांना सभेच्या प्रसंगी उपस्थित राहावे अशी विनंती केली.
महाप्रबोधन यात्रेच्या प्रचारा निमित्त आज सकाळी ७ ते ११ या वेळेत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप काळेगाव, जुजगव्हण, मन्यारवाडी, घाटसावळी या ठिकाणी भेटी देऊन सगळे संदर्भात माहिती दिली व प्रचार केला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, माजी न.प. सभापती सुनिल अनभुले सुदर्शन धांडे व आदी उपस्थित होते.