बीड कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये पार पडली. त्यानंतर अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती २०२३- २०२८ची निवडणूक मंगळवारी पार पडली. यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले अध्यक्ष या पदी साठ पैकी 50 मत घेत घवघवीत यश मिळवलं तर त्याच कार्यकारणी मध्ये प्राचार्य डॉ. दीपाताई क्षीरसागर या कार्यकारणी सदस्य म्हणून निवडून आल्या आहे. उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष प्रशासन नरेश गडेकर, कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके हे या कार्यकारणातील पदाधिकारी देखील निवडून आले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून बीड रंगभूमीवर विविध उपक्रम राबवत कलावंतांना न्याय देणाऱ्या बीड येथील के एस के महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बीड अध्यक्ष दीपाताई क्षीरसागर यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळ सदस्य पदी ६० पैकी ५८ मते मिळवत मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे. विजयी झाल्यानंतर गुलाल उधळून त्यांची मिरवणूक काढण्यात आली असून, नाट्यविश्वात आणि विशेष करून बीड कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बीडमधुन मुख्य कार्यकारणीत नियुक्त होणाऱ्या डॉ दिपाताई क्षीरसागर या पहिल्याच सदस्या आहेत.
बीडच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीला बळकटी देण्यासाठी डॉ दिपाताई क्षीरसागर यांनी सातत्याने बीड रंगभूमीवर अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रमांची उभारणी केली आहे. बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे, ज्येष्ठ नागरिक तथा रंगकर्मी यांच्यासाठी उपयुक्त असे सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच महिलांना हक्काचे रंगमंच मिळावे व त्यांच्यातील कलेला वाव मिळावा यासाठी दिपाताईंनी नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. बीड येथे संपन्न झालेले 89 वे अखिल भारतीय नाट्य संमेलन घडवून आणण्यामध्ये देखील दिपाताई यांचा सिंहाचा वाटा होता. सांस्कृतिक चळवळ टिकून राहावी यासाठी यांनी बीडमध्ये नाट्यमंदिर उभारनीत पुढाकार घेत बीड रंगभूमीला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीक्षेपातून डॉ. दीपाताई यांची अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळ सदस्य पदी नियुक्ती आगामी काळात बीड रंगभूमीला न्याय देणारी आणि नव्या अपेक्षा उंचावणारी आहे.
