आई-वडिलाप्रमाणे वैद्यकीय सेवा करण्याचे स्वप्न
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत येथील ज्ञानेश्वर पब्लिक स्कुल (डीपीएस) चा विद्यार्थी मोहम्मद दानिश मुबारक शेख याने घवघवीत यश संपादित केले आहे. त्याने 95.02 टक्के गुण मिळविले आहे.

बीड तालुक्यातील पाली येथील रहिवाशी व बीड शहरात गेली दोन दशकांपासुन वैद्यकीय सेवा देणारे डॉ. मुबारक शेख व डॉ. निखत शेख यांचा मुलगा आहे. एमबीबीएस ला प्रवेश मिळवुन आई-वडिलाप्रमाणे वैद्यकीय सेवा करण्याचे त्याचे स्वप्न आहे. दानिश ने आपल्या पालकांचे आभार मानले. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचाही त्याने आवर्जून उल्लेख केला. दानिश चे वडील डॉ. मुबारक शेख म्हणाले की त्याचे डॉक्टर बनण्याचे लहानपनापासुन चे स्वप्न आहे या दृष्टि ने तो मेहनत घेत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. दानिश ची बहीन रोशनी मुबारक शेख हिने देखील वैयकीय प्रवेश पूर्व परीक्षा (नीट) क्रैक करीत एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातुन एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे.
दानिश म्हणाला की, माझे पालक खूप सपोर्टिव्ह आहेत. ते मला नेहमी लोकांना मदत करण्यासारखे चांगले काम करण्यास प्रेरित करतात. मी डॉक्टर होऊन लोकांना मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे. माझे ध्येय गाठण्यासाठी मी खूप अभ्यास करत आहे. मला आशा आहे की मी एक दिवस डॉक्टर होण्यात यशस्वी होईल.
