-पंकजा मुंडे यांचे आश्वासन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मुस्लिम बांधव हज 2023 साठी जाणार आहेत. औरंगाबादेतुन हजसाठी रवाना होणाऱ्या बांधवांना यंदा तांत्रिक कारणामुळे 88 हजार ज्यादा भाडे लागत आहे. या संदर्भात मी स्वत: जातिने लक्ष घालुन हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
यंदा पवित्र हज यात्रेसाठी मुंबईहून विमानाने जाण्यासाठी 3 लाख 4 हजार 843 रु पये प्रवास भाडे आकारण्यात येत आहे. तर त्याच प्रवासासाठी औरंगाबाद येथन 3 लाख 92 हजार 738 रु पये भाडे निशित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातून हजला जाणारे मुस्लिम भाविकांना प्रति व्यक्ती 88 हजार रु पये जास्तीचे मोजावे लागत आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही खुप मोठी तफावत आहे. हे अतिरिक्त प्रवास भाडे कमी करावे अथवा मुंबई येथुन हजला जाण्यासाठी व्यवस्था करावी या संदर्भात अल्पसंख्यांक नेते सलीम जहांगीर यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या लक्षात आणुन दिली.
नुकतीच सलीम जहांगीर यांनी शिष्टमंडळासह पंकजा मुंडे यांची बीड येथील शासकीय विश्राम गृहात रविवार रात्री भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्यासह हज कमिटी पदाधिकारी, सदस्य यांच्यासह मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते. माझ्या जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील मुस्लिम नागरिक हज यात्रेसाठी जात आहेत. त्यांच्या अडचणी सोडविणे हे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. या प्रमुख मुद्यावर तात्काळ केंद्रीय मंत्री स्मृती इरानी आणि पीएमओ कार्यालयाशी संपर्क करून ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री व मुंबई येथील हज कमिटी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आश्वासन दिले. पंकजा मुंडे ह्या हज यात्रेकरूंच्या ज्यादा प्रवासभाडे बाबत लवकरच तोडगा काढतील असे सलीम जहांगीर यांनी ‘महाटाईम्स’शी बोलतांना सांगितले.