जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कर्करोग तपासणीसाठी कॅन्सर वॉरीयर्स तर्फे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. विराज बोरगांवकर हे दर महिण्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी जिल्हा रुग्णालय बीड येथील ओपीडी क्र. १२ येथे कर्करोग तपासणी करीता उपलब्ध राहणार आहेत.
सद्य स्थितीत असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्ये मध्ये ही फार मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनासत येत आहे. तंबाखू, दारु, विडी यांचे व्यसन, ताणतणाव व बदलत्या जिवनशैली यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग असे आजार उद्भवतात.
बीड जिल्हयातील संशयीत रुग्णांनी संबंधीत सेवोचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. जिल्हा शल्यचिकीत्सक, बीड डॉ. सुरेश साबळे यांनी केलेले आहे.