मार्केट कमिटीच्या प्रचारात आ. संदीप क्षीरसागर यांची घोषणा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये घरचा उमेदवार देणार नसून लोकशाहीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून सामान्य घरातील शेतकऱ्याचे पोर खुर्चीवर बसविणार मार्केट कमिटी प्रचारात आ.संदीप भैय्याचे सामाजिक अभिसरण कृषी उत्पन्न बाजार समितीला चाळीस वर्षाच्या जाचातून सोडविण्यासाठी सर्वांशी समतोल राखत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकशाही स्थापित करण्याचा मानस असुन निवडणूक आयोग सुद्धा आमच्यावर मेहरबान असून रोज सकाळी शेतात जाण्याआधी शेतकरी हातात कप बशी असते याचप्रमाणे शेतकरी परिवर्तन आघाडीचे उमेदवार वर्षानुवर्ष आपल्या सेवेत राहून कपबशी प्रमाणे आपल्या हातात राहतील.

छत्रीचा उपयोग फक्त पावसाळ्यात सीजन पुरताच असतो नंतर छत्रीला फेकून दिले जाते. याचप्रमाणे प्रस्थापिताचे 40 वर्षाची सत्ता फेकून देण्याचे काम आपल्याला या निवडणुकीत करायची आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी आणि शेतकऱ्याचे पोरा हेच उमेदवार आहेत.येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत माझा घरचा उमेदवार उभा राहणार नाही.असे वक्तव्य आ.संदीप क्षीरसागर यांनी कामखेड पंचायत समिती गणाच्या पारगाव येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केले.
आ माजी सय्यद सलीम : कपबशी काय असते हे प्रस्थापितांना माहीत असून विधानसभेच्या निवडणुकीत माजी निशाणी सुद्धा कपबशी होती . शेतकऱ्यांच्या हातात असलेली कप बशी उमेदवाराचे रूपाने आपल्या दारात उभी आहे म्हणून शेतकरी परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे.
अनिल जगताप : प्रस्थापितांना कात्रजचा घाट दाखवायचा असून याकरिता यापुढे प्रत्येक निवडणूक आम्ही याप्रमाणेच आघाडी करून लढणार आहोत. याप्रसंगी बोलताना सावता परिषदेची कल्याण आखाडे म्हणाले महाराष्ट्र भर सावता परिषद महाविकास आघाडीचे पाठीशी असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारसंघातील सावता परिषदेचे कार्यकर्ते सज्ज झाले असून या निवडणुकीत प्रस्थापितांची सत्ता उध्वस्त करतील या बैठकीस कामखेडा पंचायत समिती गणातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, यांच्यासह पारगाव सिरस येथील ग्रामस्थ शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी परिवर्तन आघाडीच्या प्रमुखांनी झंझावाती दौरा सुरू केले असून या अनुषंगाने कामखेडा पंचायत समिती गणाची बैठक पारगाव शिरस येथे संपन्न झाली याप्रसंगी आ संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ सय्यद सलीम शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप,काँग्रेसचे नेते रवींद्र दादा दळवी,ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे,सावता परिषदेचे संस्थापक कल्याण काका आखाडे, ज्येष्ठ नेते बबनराव गवते वैजनाथ नाना तांदळे, नगरसेवक सुनील अनभुले, राजुरी सर्कल मधील उमेदवार बळीजिजा चव्हाण, उमेदवार सौ सुभद्रा ताई माने , सचिन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
