सीएस डॉ साबळे यांच्या हस्ते उद्घाटन
By MahaTimes ऑनलाइन |
क्युअर इंडिया आणि जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय, बीड येथे दिनांक १९/०४/२०२३ रोजी क्लबफुट क्लिनीक चे उद्घाटन मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. ए. साबळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

त्यावेळी अति जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. संतोष शहाणे अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. प्रविण देशमुख डॉ. कटटे श्रीमती रमा गिरी मॅडम रोटरी क्लब चे हरिष मोटवाणी, जनार्धानराव, संजय गुप्ता, महाराष्ट्र क्लबफुट कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री. सचिन पौळ उपस्थित होते. वमा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. ए. साबळे यांनी सदर पायांचे व्यंग असणाऱ्या बालकांचे उपचार लहाणपणीच झाल्यास आपण त्यांना अपंग होण्यापासुन वाचवु शकतो.
तसचे पोन्सेंटी प्लास्टर उपचार पध्दती अतिशय सोपी, प्रभावी व स्वस्त असुन जिल्हा रुग्णालय, बीड येथे मोफत उपचार केला जाणार आहे.अस्थिव्यंग शल्यचिकित्सक डॉ. प्रविण देशमुख यांनी देखील उपस्थिांना मागदर्शन करताना वेळीच क्लबफुट बाधीत मुलांचे निदान करून त्यांना जिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचार सुरु करण्यात यावेत व क्लबफुट बाधीत व्यक्ती अपंग राहता कामा नये असे आव्हाण त्यांनी उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी केले.रोटरी क्लब चे हरिष मोटवाणी यांनी क्युअर इंडीया आणि जिल्हा रुग्णालय, बीड व क्लबफुट क्लिनीक उद्घाटनाच्या शुभेच्छा दिल्या आणि रोटरी क्लब तर्फे सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
श्री. सचिन पौळ यांनी सांगितले कि क्लबफुट ही सर्व सामान्य पणे एक जन्मजात शारिरिक विकृती असुन या मध्ये पाय आतल्या बाजुला वळलेले असतात जर या विकृतीचा वेळीच इलाज केला नाही तर बाळाला आयुष्यभरासाठी अपंगत्व येवु शकते. तसेच आलेल्या पालकांना उपचाराचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साह दिले..पुर्ण जगात प्रत्येकी १००० बालकांमध्ये एक ते दोन बालके क्लबफुट बाधीत जन्माला येतात. पुर्ण जगात दरवर्षी क्लबफुट बाधीत जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या २,२०,००० इतकी आहे. भारतात दरवर्षी ४०,००० आणि महाराष्ट्रात २४०० पेक्षा अधिक मुले क्लबफुट बाधित मुले जन्माला येतात.
क्लबफुट पुर्ण पणे बरा होवु शकतो आणि तो हि कुठल्याही शस्त्रक्रिये शिवाय त्यासाठी पोन्सेंटी उपचार पध्दती खुपच फायदेशीर ठरली आहे.क्युअर इंटरनॅशनल इंडिया ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने महाराष्ट्र शासनाशी करार करून महाराष्ट्रात शासकिय रुग्णालयामध्ये क्लबफुट उपचारची मोफत सुविधा केली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ४४ क्लबफुट चिकित्सालय कार्यरत असुन ५००० हुन अधिक क्लबफुट बाधित मुलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
आता बीड जिल्हा रुग्णालयाची महाराष्ट्र राज्याच्या यादीत भर पडणार आहे. तसेच डीईआयसी मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांची तपासणी व तालुकास्तरांवरील शिवीरामध्ये उपचार होऊ न शकणाऱ्या लाभार्थ्यांना जिल्हास्तरावरिल डीईआयसी मध्ये संदर्भ सेवा देण्यात येईल. आरबीएसके अंतर्गत संदर्भित झालेल्या सर्व लाभार्थ्यांना योग्य आणि वेळीच संदर्भ सेवा पुरविणे हा एक डीईआयसी चा मुख्य उद्देश आहे असे मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.ए.साबळे यांनी उद्घाटना प्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रुपाली सुलाखे आणि आभार प्रदर्शन क्युअर इंडिया विभागीय समन्वयक श्री. अल्फेड जेकब यांनी केले.
प्रत्येक मंगळवारी जिल्हा रुग्णालय, बीड येथे क्लबफुट क्लिनीक चालवीले जाईल क्लबफुट आजारासंबंधी आणि मोफत उपचार चिकित्सालय, संबंधीत अधिक माहितीसाठी राज्य क्लबफुट सहाय्यता क्र. ८८०००२०५२२ या क्रमांकशी संपर्क करावा. या कार्यक्रमाकरिता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ, मा. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शहाणे, मा. निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं.) डॉ. राम अवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्लबफुट क्लिनीकच्या उद्घाटनाचे नियोजन श्री. आर. के. तांगडे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक) श्री. एस. व्ही. घोडके ( सांख्यिकि अन्वेषक ) श्री. ए. पी. मोटेगावकर ( कार्यक्रम सहाय्यक) यांनी यशस्वी रित्या पार पाडले..
