चोरीच्या कलमास पोलीसांची बगल, नागरीकांची ‘एसपी’ कडे तक्रार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बांधकामावरील वस्तु चोरी का करतो ? असे विचारणाऱ्या शहानवाज सलीम खान (वय 19) या तरूणास चार ते पाच जणांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना माजलगाव येथील जुन्या बसस्थानकाजवळ घडली. मारहाणीत जखमी युवकांवर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणात ज्या पाच जणांविरु द्ध गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्याविरोधात या भागातील नागरीकांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे तक्रार केलेली आहे.
या प्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ज्या कारणावरून वाद झाला, मारहाण झाली त्याच कलमास पोलीसांनी बगल दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे चोरु न घेवुन जात असतानाचे व्हिडीओ असताना पोलीसांनी या गुह्यात चोरीचे कलम लावलेले नाही.
याप्रकरणात ज्या पाच जणांविरु द्ध गुन्हा दाखल झालेला आहे. या लोकांकडून या भागातील नागरीकांना प्रचंड त्रास दिला जातो. रहिवासी व दुकानदारांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे, दुकानासमोर घाण फेकुन देणे असे प्रकार होत असल्याचा आरोप आहे. सलमान करीम कुरेशी, मुजीब मुश्ताक सौदागर, हबीबा कुरेशी, सोहेल करीम कुरेशी, करीम कुरेशी व इतर यांच्याविरुद्ध कारवाई करून रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवावे अशा मागणीचे निवेदन नुकतेच पोलीस अधिक्षकांकडे देण्यात आले असून निवेदनावर15 नागरिकांच्या सह्या आहेत.
सर्वच आरोपी मोकाट
याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसानी चोरीचे कलम लावले नाही. अद्याप एका ही आरोपीस माजलगाव पोलिसांनी अटक केलेली नाही. या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी होत आहे.