राष्ट्रभक्ती हेच आमचे हिंदुत्व -उद्धव ठाकरे; राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे- अजित पवार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आमचे हिंदुत्वाचे विचार स्पष्ट आहे. आम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही. राष्ट्रभक्ती हेच आमचे हिंदुत्व आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी. अनेकांनी बलिदानाने आणि लढाईनंतर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. तेच स्वातंत्र्या धोक्यात आले आहे. देशाची न्यायव्यवस्थाही त्यांना ताब्यात घ्यायची आहे. देशाची न्यायव्यवस्था त्यांच्या ताब्यात गेली तर आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे आता कशालाही न घाबरता, देशातील लोकशाही रक्षणासाठी ही वज्रमूठ वापरावी लागेल, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीची एकीची वज्रमूठ आवळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विशाल मैदानावर रविवारी विराट महासभा झाली. महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होतो. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि मिध्यावर तोफ डागली. तसेच सत्ताधाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीसाठी मैदानात उतरावे, असे आव्हानही नेत्यांनी दिले आहे. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजवर आसूड ओढले.
सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तळवे चाटत होतो, असे ते म्हणतात. तर सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही शिंदे गट चे काय चाटत आहात, असा सवालही त्यांनी केला. तसेच महबूबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन करताना त्यांचे हिंदुत्व कोठे गेले होते. असा सवाल करत त्यांनी भाजपवर तोफ डागली.
राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे उद्योगधंदे राज्यात येत नाहीत. त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही महाराष्ट्र सरकार शक्तीहीन, नपुंसक असल्याचे मत नोंदवले आहे. सरकारचे काय सुरू आहे, हे यावरून दिसून येते. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. हा अपमान राज्यातील जनता सहन करणार नाही, असे राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावले. राज्यातील महापुरुषांचा अपमान होत असताना त्यांनी कोणत्या यात्रा का काढल्या नाहीत, असा सवालही त्यांनी केला. राज्यावर संकट येते, त्यावेळी मराठी माणूस एकत्र येत ते संकट परतावून लावतो. आताही अशीच एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे, असे पवार म्हणाले.
राहुल गांधी यांनी अदानी यांच्या संपत्तीबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांची खासदारकी काढण्यात आली. राज्यघटना आणि संविधानावर होणाऱ्या या हल्ल्याविरोधात जनता आता उभी राहिली आहे. जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून ते दिसून आले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.