यांत्रिकी कर्मचारी एसटी चा कणा -बी. व्ही.आरसुळे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) चे बीड विभागाच्या गेवराई आगारातील वरिष्ठ यांत्रिकी कर्मचारी (कारागीर क यांत्रिकी ) मुल्ला अल्ताफ अहमद गुलाम दस्तगीर हे 37 वर्षांच्या प्रदीर्घसेवेनंतर 31 मार्च रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ शुक्रवारी सकाळी गेवराई आगारात संपन्न झाला. आगार प्रमुख बी. व्ही. आरसुळे म्हणाले की, यांत्रिकी कर्मचारी हा एसटी चा कणा असतो. अल्ताफ अहमद यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
एसटी विभागातील वरिष्ठ यांत्रिकी कर्मचारी मुल्ला अल्ताफ अहमद गुलाम दस्तगीर यांनी माजलगाव व गेवराई आगारात काम केले. त्यांच्या सेवेचा सर्वाधिक कालावधी गेवराई आगारात गेला. दरम्यान त्यांनी विविध पदावर कार्य केले. त्यांना उत्कृष्ट सेवा राज्य परिवहन मंडळाकडून अनेकवेळा गौरविण्यात आले. दरम्यान त्यांच्या कार्यामुळे गेवराई आगार इंधन बचतीत मराठवाडा विभागात प्रथम आला होता. त्यांनी कोरोना वायरस संक्रमण काळात अधिकारी, कर्मचारी सोबत सेवा दिली. त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ शुक्रवारी (दि. 31) रोजी सकाळी गेवराई आगारात संपन्न झाला.
या प्रसंगी आगार प्रमुख बी. व्ही. आरसुळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिह्न देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री. आरसुळे यांची वरील विचार मांडले. याप्रसंगी सहायक कार्यशाळा अधीक्षक ए. टी. गरकळ, वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे.डी. शाह, महावितरणचे वजाहत अहमद, इमाद अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्री. आरसुळे म्हणाले की, कोरोना काळात व दरम्यान संपकाळातही अल्ताफ अहमद यांनी आपल्या सहकार्यांसोबत मिळून एसटी सुरळीत ठेवण्याचे कार्य लिलया पेलले. त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ होत आहे ही त्यांच्या कार्याची पावती आहे.
यावेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते जे.डी. शाह म्हणाले की, अल्ताफ अहमद यांचा सेवेचा 35 वर्षांचा कालावधी गेवराई आगारात गेला. त्यामुळे गेवराईशी त्यांचे स्नेहाचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मी गेवराई शहरवासीयांच्या वतीने या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थिती दर्शविली व त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास आगारातील कनिष्ठ सहायक श्री. मस्के, श्री.घवाडे, श्री. पोटे, श्रीमती आंधळे, यांत्रिकी कर्मचारी सर्वश्री ज्ञानेश्वर चातुर, श्री. पंडित, चिंतामणी दीपक, अनिल चव्हाण, बी.एम. भारती, वाय. बी. तिपाले, पी. जी. गोले, श्री. वरपे आदि उपस्थित होते.