18 जागांसाठी होणार निवडणूक ; 30 एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान 18 जागांसाठी 2178 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.यंदा या निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वसाधारण शेतकर्यालाही निवडणूक लढवता येणार आहे. त्यामुळे शेतकर्यात एक वेगळ्या उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात सर्वात मोठी बाजार समिती म्हणून परिचित असलेली माजलगावची उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सोमवार दि.27 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करने. 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दि. 6 ते 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. तर दि.21 एप्रिल रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत.तर 30 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 3 पर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर यावेळी शासनाने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सर्वसाधारण शेतकर्यांना ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटी मतदार संघात निवडणूक लढण्याचा अधिकार बहाल केला आहे. परंतु याठिकाणी त्यांना मतदान करता येणार नाही.
34 ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याने 300 मतदार मतदाना पासून राहणार वंचित. तालुक्यातील 34 ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे. त्यामुळे येथील मतदारांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
असे असणार संचालक मंडळ
सेवा सहकारी सोसायटी मतदार संघात-11 जागा आहेत. यात सर्वसाधारण 7,महिला 2, अनुसूचित जमाती 1, तर इतर मागासवर्गीय 1, या 11 जागासाठी एकूण 607 मतदान आहे. ग्रामपंचायत मतदार संघासाठी एकूण 4 जागा आहेत. यात सर्वसाधारण 2 अनुसूचित जाती 1 तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 1, या 4 जागेसाठी 553 मतदार आहेत. त्याचप्रमाणे व्यापारी मतदारसंघासाठी 2 जागा असून त्यात 785 मतदार आहेत. तर हमालमापाडीसाठी 1 जागा असून याठिकाणी 233 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.असे 2178 मतदार 18 जागांसाठी संचालक मंडळ निवडणार.
