विद्या नगर (पश्चिम) भागातील नागरिकांशी संवाद साधला
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील विद्या नगर (पश्चिम) भागात डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या,अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.

विद्या नगर (पश्चिम) भागात बीड नगरपालिकेच्या माध्यमातून दर्जेदार सिमेंट रस्ते, नाल्यांची कामे, पाईपलाईन, लाईट यांसह अनेक विकासाची कामे झाली आहेत. येथे असलेल्या उद्यान मध्ये गणपती मंदिर असून सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे उद्यानाच्या कंपाऊंड वॉल ची उंची कमी झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार याठिकाणी घडू शकतात. यासाठी या कंपाऊंड वॉल ची उंची वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी बैठकीत केली. उद्यान मध्ये वयोवृध्द नागरिकांना फिरण्यासाठी पेवर ब्लॉक बसविण्यात यावे, तसेच याच गार्डनमध्ये सांस्कृतिक सभागृह उभारावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्याकडे केली. डॉ.क्षीरसागर यांनी देखील त्यांच्या मागणी मान्य करत शासन दरबारी पाठपुरावा करणार आणि मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सर्व कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी संवाद साधताना डॉ.योगेश भैया क्षीरसागर म्हणाले की, शहरातील सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. स्व.काकू नानांच्या शिकवणी प्रमाणे राजकारणात सामाजिक कार्य करत आहोत.या भागात सर्व मूलभूत कामे झाली आहेत. लहानपणापासून या भागाचा विकास होताना पाहिला आहे. स्व.काकू,जयदत्त आण्णा, मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी कायमच शहराच्या विकासासाठीच काम केले. शहरात माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचे दर्जेदार कामे झाली आहेत.या भागात देखील दर्जेदार रस्ते, नाल्यांची, पाईपलाईन, लाईट ची कामे झाली आहेत.
याप्रसंगी नगरसेवक भीमराव वाघचौरे, विनोद मुळूक, महेश गर्जे, धानोरा वरवटीचे सरपंच बालासाहेब इंगोले, गौतम मस्के, प्रा.जनार्दन शेळके, विकास मस्के, अनुप देवमाने, ॲड.उदय तुपारे, विशाल तांदळे, विठ्ठल गुजर यांच्यासह स्थानिक नागरिक आणि महिला उपस्थित होते.
आमच्या समस्या डॉ.योगेशभैयाच सोडवू शकतात..!
या खेळीमेळीच्या बैठकीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. त्यांनी डॉ.योगेश भैया यांच्याशी संवाद साधताना कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडे आपले प्रश्न मांडत आहोत अशा प्रकारे मागण्या मांडल्या.आपल्या भागाचा विचार करणारे, आपल्या मूलभूत गरजा व समस्या समजून घेणारे तसेच नागरी सुविधांचा विचार करणारे डॉ.योगेश भैया आपल्या सोबत आहेत.अशी भावना नागरिकांत दिसून आली, डॉ.योगेश भैया हेच आमच्या अडचणी समजून त्या सोडवू शकतात, आमच्यासाठी सुसंस्कृत, शांत,संयमी युवा नेते शहराचा नेतृत्व करू शकतात अशी स्थानिक नागरिकात चर्चा होती.
