उत्स्फूर्त प्रतिसाद : तीन दिवसांत हजारो शेतकरी, सामान्य नागरिकांनी दिल्या भेटी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील जिल्हा कृषि महोत्सवात नाथ बायोजिन्स (इं) लि. औरंगाबादच्या स्टॉलला शेतकरी व व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, प्रकल्प संचालक (आत्मा) सुभाष साळवे आदि अधिकाऱ्यांनी स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन प्रसिध्द नाथ सीडस् चे उत्पादन नेहाळले.
उन्नत शेती समृध्द शेतकरी कृषी महोत्सव 2023 अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 24 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या पाच दिवसीय कृषी महोत्सव सुरू आहे. या दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्टॉलला भेट दिली असता यावेळी उपस्थित नाथ बायोजिन्स (इं) लि. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक के. एफ. शेख यांनी मा. जिल्हाधिकारी यांना नाथ कंपनी चे विविध कपाशीचे वान बाबत माहिती देत त्यांची संकेत बीटी कापुस वान ची माहिती पुस्तिका दिली. यावेळी कंपनी चे प्रतिनिधी अशोक तोडकर, राम रासवे उपस्थित होते.
शेतकरी व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कृषी महोत्सवात शेकडो कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक सहभागी झाले आहेत. यात औरंगाबाद येथील नामांकित नाथ सीडस् उद्योगसमूहाच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या मंगळवारी (28 फेब्रुवारी) कृषि महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. पाच दिवसीय प्रदर्शनामध्ये जिल्हाभरातून दररोज हजारोंच्या संख्येत शेतकरी व सर्वसामान्य लोक भेट देत आहेत. शेतकऱ्यांच्या विश्वासात पात्र ठरलेने नाथ सीडस् कंपनी बाबत शेतकरी आणखी माहिती जाणुन घेण्यास उत्सुक असल्याचे दिसुन आले.
दरम्यान कंपनीचे प्रतिनिधी स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येकास कपाशीचे वान संकेत बीटी कापुस, जम्बो 303 व एन.बी. सी-10 या वाणाची तसेच बाजरा एन. बी.एच. 1717 व गहु मोहन वंडर या वाणांची माहिती हे देत आहेत. शेतकरी व प्रगतिशिल शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंका-निरसन करीत आहेत. जिल्हाभरातील शेतकऱ्यांसह स्थानिक व शेजारी जिल्ह्यातुन आलेल्या व्यापारी बांधवांनी ही नाथ सीडस् कंपनीच्या स्टॉलला भेट दिल्याची माहिती शेख यांनी दिली.