विदेशी कलाकारांचा फायर शो, पंजाबचा प्रसिद्ध वीर खालसा कला, नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले!
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सकाळी हजारोंच्या साक्षीने शासकीय महापूजाची सुरुवात झाली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व आश्वास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजा आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे, न.प. मुख्याधिकारी सौ.निताताई अंधारे यांच्या शुभहस्ते महापूजन करून भगवा ध्वज फडकविण्यात आला.

याप्रसंगी मावळे, ढोल ताशा, तुतारी पोलीस बँडने जिजाऊ गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर पोलीस बँडने राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. यानंतर जिल्हाधिकारी सौ. दीपा मुधोळ-मुंडे, आ संदीप क्षीरसागर माजी आ.सय्यद सलीम यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा न्यायालयात वकील संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. या शासकीय महापूजेस प्रशासकीय सेवेतील अधिकारी,पदाधिकारी, बीड शहर वकील संघ, विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्ती सार्वजनिक शिवजयंती चे अध्यक्ष शाहिनाथ परभणे, उपाध्यक्ष शेख वकील सर, सचिव विशाल तांदळेसह पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी हजारो महिलाभगिनी आणि नागरिक, पदाधिकार्यांसह ही शासकीय महापूजा संपन्न झाली.
छत्रपती शिवाजी राजासह माता जिजाऊ विसरून चालणार नाही -सौ.सुनंदाताई पवार

अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणारे, अठरा पगड जातीधर्मांना सोबत घेऊन शेकडो लढय्या लढणारे जाणताराजांची किर्ती हिमलायपेक्षा जास्त आहेे पण या राजाला संस्कार, विचार, राजशिष्टाचार शिकविणारा आई जिजाऊंना विसरून चालणार नाही असे वक्तव्य बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त/सचिव तथा आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या बीड शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवच्या कार्यक्रमात मुख्यअतिथी म्हणून बोलतांना व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरूवात आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सुप्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय कलाकारांने सज्ज अशा शिवजयंतीचा उद्घाटन समारंभ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पुजन करून पुष्पहार घालुन प्रमुख अतिथी बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त/सचिव तथा आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार, आ.संदीप क्षीरसागर सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर यांच्या शुभहस्ते आणि अमरसिंह पंडित,माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.पृथ्वीराज साठे, बीड जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली.
या प्रसंगी बोलतांना प्रमुख अतिथी सौ.सुनंदाताई पवार म्हणाले की, आ.संदीप दादा आणि नेहाताईमुळे बीडच्या शिवजयंतीत येण्याचा योग आला असून अतिशय सुंदर देखणा आंतरराष्ट्रीय कलाकारांचा शिवजयंती सोहळा पाहुन मन प्रसन्न झाले आहे. नुसती जयंती साजरी करूनच नव्हे तर 18 पगड जाती धर्माला घेऊन जाणार्या छत्रपती शिवाजी महाराजचे विचार आचरणात आणण्याची काळाची गरज असून माताभगिणींनी आपल्या मुलांना जिजाऊ प्रमाणे शिकवण द्यावी. यामुळे भविष्यात युवकांच्या माध्यमातून घराघरात शिवबा जन्मास येतील असे ही त्या यावेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमची करवीर नाद कोल्हापूर ढोला ताशा पथकाने केली. त्यानंतर नामांकित करवीर ढोल पथक, केरळचे शबरी चेंडे नृत्यु, विदेशी कलाकारांचा फायर शो, पंजबाचा प्रसिद्ध वीर खालसा कला, केरळचे शबरी चेंडे नृत्यु व शेवटी 650 वादकांनी आपली कला सादर केली. यावेळी माताभगिणी, ज्येष्ठ नागरिक यांच्या करिता विशेष आसन व्यवस्था केल्यामुळे तर जागोजागी एलईडी स्क्रीन लावल्यामुळे नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले अशी भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली. यावेळी माता भगिनी ज्येष्ठ बांधव,युवक, युवती यांची हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.
आ.संदीप क्षीरसागर : यावेळी आभार मानतांना म्हणाले, गेल्या महिनाभरापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम करीत असलेल्या सहकार्यांनी बीड मतदार संघातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी, महिलांनी सर्वांनी युद्धपातळीवर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे शतश: आभार यावेळी त्यांनी मानले.
