विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांकडून सत्कार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दिपा मुधोळ – मुंडे यांच्या रूपात महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत. बुधवारी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पहिली महिला जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या सुनबाई (कन्हेरवाडीच्या ता. परळी) असा दुहेरी संयोग त्यामुळे त्यांच्याकडून जिल्हावासीयांना खूप आशा आहेत.
त्यांच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांची स्वागतासाठी रिघ लागली आहे.
मराठी पत्रकार संघ : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, शाखा बीड च्यावतीने नुतन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांचा गुरूवारी यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हा संघटक शेख आयुब, जिल्हा उपाध्यक्ष रईस खान,व दीपक काळकुटे आदि उपस्थित होते.
खटोड, बंब यांनी केले स्वागत :सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड व सामाजिक कार्यकर्ते विजयराज बंब, दैनिक लोकाशाचे एमडी रोशन बंब अदिंनी गुरूवार नुतन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांचा फेटा बांधुन स्वागत केले.
डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांनी केले स्वागत : नुतन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ (मुंडे) यांचा सत्कार करतांना डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर समवेत मा.नगरसेवक विनोद मुळूक, भिमराव वाघचौरे, विलास विधाते, भास्कर जाधव, गणेश वाघमारे, रंजित बनसोडे, गणपत डोईफोडे आदि.
अब्दुल रहेमान, पोपळे, शेख, कापसे यांनी केले स्वागत: नुतन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचा स्वागतपर सत्कार करताना सा. प्रकाश आधार चे संपादक सुनील पोपळे, सा. लोकनाथ चे संपादक अब्दुल रहेमान, सा. लोकमित्र चे संपादक शेख ताहेर, सा.गेवराई संघर्ष योद्धा चे संपादक अमोल कापसे दिसत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत : येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद भैय्या कुरैशी, मानवी हक्क अभियान चे तालुकाध्यक्ष दीपक सुतार, गेवराई चे माजी नगरसेवक सय्यद एजाज़, संघर्ष वडमारे आदिंनी नुतन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ – मुंडे यांचे स्वागत केले.