महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पदके मिळवून दिली; सर्व स्तरातून अभिनंदन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड जिल्ह्याचा सुपुत्र खेळाडू काझी अब्दुल अजीज सरफराज याने नेत्र दीपक कामगिरी करत महाराष्ट्र राज्य ला दोन राष्ट्रीय पदक मिळवून दिले. या कामगिरीबद्दल अब्दुल अजीज याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जम्प रोप फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य जम्प रोप असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 19 वी ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीप 18 वी सब ज्युनिअर फेडरेशन कप 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रवारी दरम्यान राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले होते. समता इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव येथे आयोजित केलेल्या पंधराव्या जुनियर गट राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेमध्ये भारतातील सुमारे 16 पेक्षा जास्त राज्य संघाने भाग घेतला होता यामध्ये बीड जिल्ह्याचा सुपुत्र खेळाडू काझी अब्दुल अजीज सरफराज याने नेत्र दीपक कामगिरी करत महाराष्ट्र राज्य ला दोन राष्ट्रीय पदक मिळवून दिले.
या खेळाडू ने Endurance 3 मिनिट या प्रकारात गोल्ड मेडल मिळवले व डबल अंडर या प्रकारात सिल्वर मेडल मिळवले. काझी कुटुंबातील त्याचे आजोबा स्वर्गीय काझी मुझफ्फरोद्दीन हे व्हॉलीबॉल चे उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू होते. त्याचे वडील हे सुद्धा व्हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू होते ते सध्या मॉडर्न महिला बी. एड कॉलेज येथे प्राध्यापक आहेत.
या खेळाडू ला पूर्णवाद स्पोर्ट्स अँड प्रमोशन अकॅडमी बीड येथे राष्ट्रीय प्रशिक्षक तथा जम्प रोप असोसिएशनचे जिल्हा सेक्रेटरी विनायक वझे यांनी प्रशिक्षण दिले. अब्दुल अजीज याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती देशमुख मॅडम यांनी अभिनंदन केले असून या कामगिरीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
