आरोपी पति स्वत: हून ठाण्यात हजर झाला
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : केज तालुक्यातील ढाकेफळ शिवारातील चौसा वस्तीवर पत्नीचा कुऱ्हाडी ने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (दि. 7) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने केज तालुका हादरला आहे.

आरती भगवान थोरात ( 25 ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. यानंतर पती भगवान शाहूराव थोरात पोलीस ठाण्यात हजर झाला आणि हत्येची कबुली दिली. प्राथमिक माहितीनुसार आज मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास वस्तीवरच पती भगवान शाहूराव भोरान याने पत्नी आरती थोरात यांच्या गळ्यावर कुऱ्हाडी ने वार करून ठार मारले. दरम्यान मुले शाळेत गेले होते तर आई-वडील गावी गेल्याने घरी कोणीच नव्हते. आरोपी पतीस युसुफ वडगाव पोलीसांनी अटक करून गुन्हा नोंद केला आहे.
घटनास्थळी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह केज से उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस पंकज कुमावत यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या खूना मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
