महासंघाचे ३७ व्या वर्धापन दिना मंत्रालय मुंबईत पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कार्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल महाराष्ट्रातील बीड जिल्हा राजपत्रित अधिकारी महासंघ समन्वय समितीचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते येथे दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे 37 व्या वर्धापन दिना निमीत्त राज्यातील मोजक्या जिल्ह्यांत बीड जिल्हा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ समन्वय समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे असे महासंघाचे मुख्यसल्लागार ग. दि. कुलथे यांनी कळविले आहे.
मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे परिषद सभागृहात होणाऱ्या गुण गौरव कार्यक्रमात बीड जिल्ह्य़ातील राज्य संघटक प्रल्हाद जावळे, अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह श्री. शिवप्रसाद जटाळे, कार्याध्यक्ष तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. , श्री. दिलीप झिरपे, सरचिटणीस तथा जिल्हा कोषागार अधिकारी, श्री. सतिष घोळवे, कोषाध्यक्ष तथा अप्पर कोषागार अधिकारी, श्री. विजय देशमुख,जनसंवाद सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. साळवे, जिल्हा कृषी अधिकारी, श्री. संजय कुलकर्णी, सहाय्यक लेखा अधिकारी जि.प. महिला व बाल कल्याण विभाग या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विभागीय आयुक्त कोकण भवन महेंद्र कल्याणकर, मुंबई जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, बृहंमुबई मनपा आयुक्त आय. एस. चहल उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. सदरील कार्यक्रमानिमीत्त महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ जुनी पेंन्शन योजना लागु करण्याबाबत आग्रही भुमीका मांडणार असुन या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई व राज्य संघटनेचे समीर भाटकर, नितीन काळे व डॉ. सोनाली कदम अध्यक्ष दुर्गा महिला मंच यांनी आवाहन करण्यात आले आहे.