टाकरवन येथे गुरुवारी पहाटे घडली घटना
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : एका 31 वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या साखर झोपेत झोपेत असलेल्या बापावर खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यावर घाव करून खून केल्याची घटना गुरुवार दि. 2 रोजी माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान घडली. आरोपी मुलास माजलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मारोती लक्ष्मण भुंबे (वय 55) रा. टाकरवन ता. माजलगाव असे मृत वडिलाचे नाव आहे. मयत मारोती यांचा भोळसर मुलगा आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे (वय 31) मागील आठ दिवसांपासून गायब होता. तो नेहमीच घरातून कोणालाही न सांगता निघून जात असे अशी माहिती परिसरातून मिळते. मयत वडील मारोती लक्ष्मण भुबे यांचे भोळसर मुलावर प्रेम होते. त्यांनीच त्याला सापडून घरी आणल्याचे ऐकायला मिळते. गुरुवार दि.2 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान साखर झोपेत असणाऱ्या बापावर एकाएकी भोळसर मुलाने खोऱ्याच्या तुंब्यानी डोक्यावर प्रहार करू लागला. यावर घरात असलेल्या नातेवाईकाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.
जखमी अवस्थेतील मारोती भुंबे उपचारार्थ दवाखान्यात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतानाही पुन्हा त्या भोळसर मुलाने जखमी बापाच्या खोऱ्याने डोक्यात प्रहार केले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान माजलगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकल, पोलीस उपनरीक्षक सचिन दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल बी. बी. खराडे यांनी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले आहे सदरील खुनाचे कारण समोर आले नाही आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण भुंबे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
