बीड जिल्हास्तर 8 ते 10 फेब्रुवारीला स्पर्धा कार्यक्रम
महाराष्ट्राच्या खेडोपाडी फुटबॉल रुजावा म्हणून ‘या’ बलाढ्य देशाने घेतला पुढाकार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला असून फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबध्द प्रशिक्षण, पायाभुत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

या अंतर्गत बीड जिल्हास्तर स्पर्धा कार्यक्रम दि. 8 ते 10 फेब्रुवारी 2023 कालावधीत सैनिकी स्कुल, नगररोड, बीड येथे 14 वर्षाखालील मुलांच्या गटात घेण्यात येणार आहे. जिल्हा स्तर एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल 14 वर्षाच्या आतील जास्तीत जास्त मुलांचे संघांना सहभागी होता येईल. शैक्षणिक संस्था फुटबॉल संघटना व फुटबॉल क्लब यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, यासाठी दि. 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड येथे प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बीड यांनी केले आहे.
निवडक 20 खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे येणे, निवास, प्रशिक्षण
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्या करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दा नमूद असून या अंतर्गत राज्यत 14 वर्षाखालील मुलांच्या एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करुन त्यातुन निवडलेल्या 20 खेळाडूंना म्युनिक, जर्मनी येथे जाणे येणे, निवास, प्रशिक्षण इत्यादी बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांचा लोगो वापरण्यासाठी परवानगी दिली असून एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप टी. व्ही. 9 मराठी मिडीया पार्टनर आहेत.
राज्यातुन 20 खेळाडू जर्मनी येथे फुटबॉल प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत एफ.सी. बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे.
खेळात सहभागी होण्यासाठी अटी पुढीलप्रमाणे
यासाठी 14 वर्षाखालील मुले दि. 1 जानेवारी 2009 नतंरचा जन्म असावा, खेळाडू मुलांची संख्या 20, मार्गदर्शक व व्यवस्थापक 2, एकूण 22 जणांचा समावेशासह प्रवेशिकांसोबत खेळाडूंचे आधारकार्ड, पॅन कार्ड, बोनाफाईट प्रमाणपत्र, निवास लाईट बील सादर करावेत.
