शिबिरात 95 जणांनी केले रक्तदान; निवडक लोकांना पुरस्कार प्रदान
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अल-खैर फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून मानवता सेवा आणि समाज कार्य मध्ये कार्यरत आहे. कुठलीही प्रसिद्धी न करता आणि कोणत्याही वैयक्तिक प्रदर्शनाशिवाय गोरगरीब, गरजूवंत आणि परेशान लोकांसाठी प्रशंसनीय कार्य करत आहेत असे मत बीड जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश साबळे यांनी व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिन आणि अल-खैर फाउंडेशनच्या पाचव्या स्थापना दिनानिमित्त 95 किशोरवयीन मुलांनी देश आणि मानवतेच्या कल्याणासाठी रक्तदान केले. यावेळी डॉ.सुरेश साबळे यांना मानवसेवा पुरस्कार पत्रकार भागवत तावरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार , अवामी खिदमत व ज्येष्ठ नेते सय्यद मोईन मास्टर यांना उत्कृष्ट नेता पुरस्कार व नवीद शेख यांना मानवसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सय्यद मोईन मास्तर होते, तर प्रमुख उस्थितीमध्ये डॉ.योगेश क्षिरसागर (युवा नेते, शिवसेना) , डॉ. समीर शेख(न्यूरो सर्जन), सय्यद फारूक पटेल(नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष) अॅड. शफीक भाऊ (MIM बीड अध्यक्ष) वरिष्ठ कायदाविधी तज्ञ अड अझहर अली, शुभम धूत (नगरसेवक) महेश शिंगने, अतुल केदार, नसीर अहमद अन्सारी, अशफाक इनामदार, खुर्शीद आलम (माजी सभापती), मतीन भैया (एमआयएम नेते), बरकत पठाण (राष्ट्रवादीचे नेते), डॉ. काझी माजिद, रफिक बागबान (ओबीसी जिल्हाध्यक्ष), शेख इजाज खन्ना, सय्यद नबील-उल-जमा (युवा नेते), रहमत पठाण, शाकीर भाई, काझी मखदूम ( संपादक) , शेख मुजीब (सिटीझन संपादक), डॉ. सिराज अहमद खान आरजू (मुख्य संपादक सरकार एक्सप्रेस), जावेद पाशा (दैनिक एतिमाद आणि शमा रहबर), सय्यद फिरोज अली (दैनिक अभिमान), कामरान खान (संपादक दैनिक किसान), शेख वकील सर (सचिव सर सय्यद स्कूल), उमेर सलीम सर (सचिव, मिल्लत ग्रुप ऑफ स्कूल), अकील सर (सर सय्यद स्कूलचे अध्यक्ष), जाहिद हुसेन सर (अध्यक्ष, मिल्लत स्कूलचे शिक्षक), मोमीन तोसीफ सर, अफसर सर, कादीर-उझ जमान खान, हाजी अब्दुल गनी, अफरोज बागे (इमदाद गुरुप), जकी सौदागर, वसीम अन्सारी सर (प्राचार्य उर्दू ज्युनियर कॉलेज), सय्यद लईक सर, मोहसीन बेग सर, नासेर चिश्ती सर, पवार सर (ब्राईट कोचिंग), डॉ. शकील सर (शारीरिक प्रशिक्षक) आदींनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. जोहेब अली, शेख रफत, अतुल केदार, मोमीन समीउद्दीन, शेख वासिक, शेख रियाज सिव्हिल हॉस्पिटल, शेख परवेज, शेख रेहान, सीराज इनामदार, इजी. अझहर इनामदार (अध्यक्ष अल खैर), आमिर खान (सचिव अल खैर), मोमीन रझी उद्दीन (उपाध्यक्ष अल खैर), इंजी अजीम अली, सय्यद आतिफ, इंजि इलियास सिद्दीकी, ईंजी तौसीफ कुरेशी, माजिद खान, फरीद खान, शेख अब्दुल रहीम गुलाम साकिब डॉ. हसीब ऍक्सिस ऑर्थो, डॉ. अब्दुल गफार खान एशियन फिजिओ आणि इतर अल खैर टीम सदस्यांनी खूप मेहनत घेतली.
