अत्तार समाजाची खा.प्रितमताईंकडे निवेदनाद्वारे मागणी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अत्तार समाजाचा पारंपारिक व्यवसाय असलेला हळद – कुंकु, प्रसाद, फुले विक्रीच्या व्यवसायासाठी कायमस्वरुपी जागा द्या या मागणीचे निवेदन महाराष्ट्र युनियन ऑफ अत्तार युथ विंग या अत्तार संघटनेच्या वतीने तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व खा.प्रितमताई मुंडे यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, समाजातील प्रत्येक सणाच्या वेळी हळद-कुंकु, प्रसाद, फुले इत्यादी सणाचे साहित्य विक्री करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करणार्या अत्तार समाजाकरीता बाजारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने समाजबांधव हे मिळेल त्या ठिकाणी सदर व्यवसाय करत आहोत पर्यायी कायमस्वरुपी जागा नसल्याने हा व्यवसाय एका ठिकाणी स्थिर नसून आमच्या कुटूंबाची उपासमार होत आहे. तसेच माल खरेदीचाही आर्थिक भुर्दंड आम्हाला सहन करावा लागतो. आम्हाला आमचा व्यवसाय करुन किमान दोन वेळेसचे तरी जेवण नीट करता येईल अशी जागा आम्हाला बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्यात यावी.
आम्ही रस्त्यावर व्यवसाय केला असता आम्हाला दुकानदार हाकलून देतात, केस टाकण्याची धमकी देतात. यामुळे आमच्या कुटूंबाची उपासमार होत आहे.अशा मागणीचे निवेदन अत्तार समाज जिल्हा बांधव व मराठवाड्यातील समाज बांधवांनी खा.प्रितमताई मुंडे व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखन बावनकुळे यांच्याकडे युनियन अध्यक्ष शेख मोहम्मद सलीम, परवेज अत्तार, जुबेर अत्तार यांनी निवेदना दूवारे केली आहे.
