हजरत मौलाना महंमद उमरैन महफूज रहमानी यांचे मार्गदर्शन लाभणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : सोमवारी बीड येथे इस्लाहे मुआशरा (समाज सुधार) या विषयावर हजरत मौलाना महंमद उमरन महफूज रहमानी साहब खलीफा मौलाना सय्यद महमदवली रहमानी व सेक्रेटरी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

मिल्लिया महाविद्यालय ग्राउंड, किल्ला मैदान येथे 23 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित या कार्यक्र माच्या अध्यस्थानी हजरत मौलाना शेख अहमद कासमी राहणार आहेत. या प्रसंगी हजरत मौलाना मुफ्ती आरिफ साहब, हजरत मौलाना अमिन साहब कासमी, हजरत मौलाना बाकी साहब, हजरत मौलाना नसरुल्लाह रहमानी, हजरत मौलाना मुफ्ती अब्दुल्ला साहब, हजरत मौलाना जाहद साहब नदवी, हजरत मौलाना अब्दुल रहीम जाहेद साहब नदवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती मोहीयाद्दिन कासमी हे करतील.
सदर कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्र मास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकाकडुन करण्यात आले आहे. सदर कार्यक्र माचे आयोजन मुरीदीन व मुतवस्सीलीन तसेच बीड शहर युवा वर्गाकडुन करण्यात आले आहे.
