राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना ठरली संजीवनी; आतापर्यंत 63 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र मातंर्गत 0 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार व शस्त्रक्रि या करण्यात येतात. बीड जिल्हयामध्ये आपोलो हॉस्पीटल, मुंबई यांच्या मार्फत डी ईको शिबीर आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 30 लाभार्थी शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेले होते.
त्याअनुषंगाने शिरूर (का.) तालुक्यातील 2 लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया दिनांक 19 रोजी आपोलो हॉस्पीटल, मुंबई येथे कुमारी कोमल संमगे, जिल्हा परिषद कन्या शाळा, खोकरमोहा वय – 15 वर्षे व कुमारी श्रावणी जाधव, जिल्हा परिषद शाळा, तितंरवणी वय 10 वर्षे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रि या करण्यात आल्या.
ही योजना जिल्ह्यातील बालकांसाठी नवसंजीवनीच ठरली आहे. माहे डिसेंबर 2022 आखेर 142 लाभार्थ्यांपैकी 63 लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. उर्वरीत लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रि या पूढील 2 महिन्यात विविध मान्यता प्राप्त हॉस्पीटल मध्ये करण्यात येणार आहेत.
सदर हृदय शस्त्रक्रि या यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. राम आवाड निवासी वैद्यकीय अधिकारी ( बां.सं.), श्री आर. के. तांगडे, आर.बी.एस.के. चे समन्वयक, श्री विलास घोडके व श्री अमित मोटेगावकर व तालुकास्तरीय वैद्यकिय पथके यांनी परिश्रम घेतले.
अशी होते अंमलबजावणी
प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रु ग्णालय अथवा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रु ग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.
जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जातो. ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते त्यांच्यावर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. सुरू शैक्षणिक वर्षात माहे डिसेंबर 2022 आखेर जिल्ह्यातील142 लाभार्थ्यांपैकी 63 विद्यार्थ्यांवर या योजनेतून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झाली.
डॉ. सुरेश साबळे,
जिल्हा शल्य चिकीत्सक, बीड