जमीयत माणुसकीच्या नात्याने समाज हिताचे कार्य करते -हाफेज नदीम सिद्दिकी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जमीयत उलेमा ए हिंद नेहमी मदतीचा हाथ पुढे केला आहे. हे संघटन माणुसकीच्या नात्याने समाज हिताचे कार्य करत आहे. आस्मानी संकट असो की नागरिकांच्या समस्या असो मदतीसाठी सदैव पुढाकार घेतलेला आहे. असे मत महाराष्ट्र अध्यक्ष हाफेज नदीम सिद्दिकी साहब यांनी व्यक्त केले.

येथील नगरपरिषद कॉम्प्लेक्स येथे सोमवारी सकाळी 11 वाजता जमीयत उलेमा हिंद जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन हाफेज नदीम सिद्दिकी साहब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जमीयत चे जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला कासमी साहब, माजी आ. सिराज देशमुख, मुज्तबा अहमद खान सर, काझी मुजीब सर, हसीन अख्तर सर, हाजी एक़बाल कुरैशी, सलाम सेठ, मौलाना वसीम कासमी, मौलाना साबेर, एड. सरफराज, मोईन मास्टर, संपादक काझी मकदुम, काज़ी ज़फर, शेख निज़ाम, अशफाक ईनामदार, खुर्शीद आलम, अय्यूब खान, अमरजान खान,खमरोद्दीन इनामदार, हाफेज अफसर, हाफेज सरताज, असद भाई धारूर, नाजेम भाई, नोमान चाउस, हाफेज मन्सुर आदि उपस्थित होते.

जमीयत उलेमा हिंद चे जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला कासमी म्हणाले की, कामासाठी कार्यालय असने गरजेचे आहे असे नव्हे तर यासाठी कष्ट करणे गरजेचे आहे. उलेमांनी समाजासाठी गल्लो गल्ली जाउन काम केले आहे. आम्ही सदैव काम करीत असुन यापुढे ही काम करत राहणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवरांनी जमीयतच्या माध्यमातुन सामान्य नागरिक व गोरगरिबांच्या समस्या कशा प्रकारे सोडवण्यात यावे याविषयी मार्गदर्शन केले. या उद्घाटन समारंभास पदाधिकारी व सदस्यासह जिल्हाभरातून शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित होते.
तीन विद्यार्थ्यांना 50 हजाराचे अर्थसहाय्य
जमीयत उलमा ए हिंद सामान्य नागरिक व गोरगरीबांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेतला आहे. आस्मानी संकट असो की नागरिकांच्या समस्या असो जमीयत उलेमा हिंद ने अनेक वेळा मदतीचा हात पुढे केला आहे. याचाच एक भाग आज कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी तीन विद्यारर्थ्यांना 50 हजार रूपयाची स्कॉलरशिप वाटप करण्यात आली. दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रूपयाची तर एका विद्यार्थ्यास दहा हजार रु पयाची आर्थिक मदत करण्यात आली.
