शहरातील नदीचे पूर्ण पात्र स्वच्छ होईपर्यंत मोहीम चालू ठेवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न – जिल्हाधिकारी शर्मा
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आज सलग दुसऱ्या आठवड्यात शनिवारी नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी नगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि सर्व यंत्रणा सोबत घेवून जेसीबी, पोकलेन व ट्रॅक्टर्सच्या साह्याने शहरातील जुनी वेस दगडी पुल परिसर पलीकडे बाजूचा नदीचा भागात बिंदुसरा नदीचे पात्र आणि पुलाजवळ ठिकठिकाणी साचलेला कचरा काढण्यासाठी कार्यवाही सुरू केली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले, सात जानेवारीपासून सुरू केलेल्या या नदी स्वच्छता मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर स्वयंसेवी संस्था या कार्यासाठी पुढे येत आहेत. नगरपरिषदेच्या दोनशे कर्मचारी ट्रॅक्टर जेसीबी आधी यंत्रणेचा वापर करून मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु यामध्ये अधिकाधिक लोक सहभाग वाढण्याची आवश्यकता आहे. यामाध्यमा तून बीड शहरातील नदीचे पूर्ण पात्र स्वच्छ होईपर्यंत चालू ठेवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने हे देखील उपस्थित होते.

शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांच्या सूचनेनुसार बीड नगर परिषदेच्या यंत्रणेमार्फत मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी बीड शहरातील बिंदुसरा नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. आज जुनी वेस कडून दगडी पुल परिसर पलीकडे कंकालेश्वर मंदिराकडे जाणारा पुलाच्या रस्त्याच्या बाजूचा नदीचा भागा जवळील बिंदुसरा नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले. पुलाखाली साचलेला कचरा, जेसीबीच्या साह्याने उचलण्यात आला. यावेळी दगडी पुलालगतचे पात्र स्वच्छ होईपर्यंत मोहिम सुरू राहणार आहे, पात्र स्वच्छ व्हावे यासाठी नगर पालिकेच्या माध्यमातून साफसफाई आणि स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारानंतर आता नागरिकांनीही बिंदुसरेचे पात्र स्वच्छ राहील यासाठी आपली जबाबदारी ओळखून यानदीत कुठेही कचरा फेकला नाही पाहिजे तरच ही मोहीम यशस्वी होईल.या कार्यवाहीसाठी लोकसहभाग व प्राप्त होणारा निधी यासाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्यात येत आहे, असे मुख्याधिकारी श्रीमती अंधारे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बिंदुसरा स्वच्छतेची संकल्पना त्यांच्या मनामध्ये होते. सदर काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुख्याधिकारी श्रीमती अंधारे यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करीत नगर परिषदेच्या यंत्रणेला कार्यान्वित केले. मागच्या शनिवारी सदर मोहीम सुरुवात करण्यात आले असून सोमेश्वर मंदिर पासून सुरुवात झाली आहे. खूप मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ आणि प्लास्टीक उचलून पात्र स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर आज शनिवारी पुन्हा शहरातील जुनी वेस कडून दगडी पुल परिसर पलीकडे कंकालेश्वर मंदिरा कडे जाणारा रस्त्या च्या बाजूचा नदीचा भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
