लोकशाही जिवंत राहण्यासाठी पत्रकारीता गरजेची – पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर
वृत्तपत्र टिकण्यासाठी वर्तमानपत्राची विक्री किंमत वाढवावीच लागेल – वसंत मुंडे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : वर्तमानपत्राची संख्या वाढत असली तरी देखील बीडच्या वृत्तपत्रांनी आपल्या परखड लेखनीतून दर्जा टिकवला आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी वास्तव पत्रकारीतेची गरज कायम असणार आहे. असे मत पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी व्यक्त केले. तर काम करणार्यांच्या पाठीशी उभी राहणारी बीडची पत्रकारीता कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी व्यक्त केले. वृत्तपत्र टिकण्यासाठी वर्तमानपत्राची किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावाच लागेल तरच वृत्तपत्र क्षेत्र टिकेल असे परखड मत पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबई च्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता बीड येथील स.मा.गर्गे भवन येथे दर्पणदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. दर्पणदिन पुरस्कार वितरण सोहळ्यास अध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे लाभले. तर प्रमुख अतिथी म्हणून बीडचे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ, भंडार्याचे माहिती अधिकारी बीडचे भूमीपुत्र फहाद काझी यांच्यासह सत्कार मूर्ती दर्पणकार संपादक नरेंद्र कांकरीया, खालेक पेंटर, एबीपी माझाचे गोविंद शेळके, वैचारीक दूतचे मानकरी वृत्तपत्र विक्रेते सुदाम चव्हाण, साप्ताहिक संपादिका प्रतिभाताई गणोरकर त्याचबरोबर पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख, ज्येष्ठ संपादक राजेंद्र आगवान, दिलीप खिस्ती, मकदूम काझी, डॉ.गणेश ढवळे, सर्वौत्तम गावरस्कर, विश्वनाथ माणूसमारे, राजेंद्र होळकर, शेखर कुमार, बालाजी तोंडे, सुरेश जाधव, नारायण नागरे, कमलताई डोंगरे, प्रतापराव सासवडे, भास्कर इप्पर, रमाकांत गायकवाड, शेरजमा पठाण, शेख आयेशा, सुमूर्ती वाघीरे, दिपक काळकुटे, प्रमोद ठोसर, सदाशिव नाईक, गव्हाणे, शेख वसीम, रईस खान, शेख आय्युब, शेख जबुेर, शेख ताहेर, इरफान शेख, शैलेश गोलांडे, शिवप्रसाद सिरसाट, विशाल गणोरकर, पारस पोरवाल, भागवत वैद्य, नितेश उपाध्ये आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना नंदकुमार ठाकूर म्हणाले, बीडमध्ये चांगल्या कामाचे नेहमीच कौतुक होते. चुकीच्या कामांना माफी दिली जात नाही. बीड मागासलेले आहे असे म्हटले जाते. पण वास्तवात तसे आजिबात नाही. समाज आणि पत्रकारीता ही वेगळी करता येवू शकत नाही. असे मत व्यक्त करुन त्यांनी मला एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचे साक्षीदार होता आले याचा आनंद होत असल्याचे गौरवोद्गार काढले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले, बीडची पत्रकारीता ही चांगला कामांना वाव देणारी आहे. माझी बीडवरुन बदली झाल्यानंतर पत्रकारच रस्त्यावर उतरले आणि काम करणार्या माझ्यासारख्या एका अधिकार्याच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे शासनाला मला बीड येथे नियुक्त करावे लागले.
पडद्यामागील कर्तृत्ववान व्यक्तीचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये आदर्श रुग्णसेवक म्हणून दैनिक अभिमानचे अमजद पठाण मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
नरेंद्र कांकरीया : आयुष्यातील 45 वर्ष पत्रकारीता करताना काही मिळवायचे म्हणून कधी पत्रकारीता केली नाही. वृत्तपत्र चालवणे सोपे नाही. माझ्या पत्नीला तीन वेळा गळ्यातील मंगळसुत्र विकावे लागले. ही परिस्थिती देखील मी अनुभवली. अनेक प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मी या क्षेत्रात स्थिरावले. दोन्ही मुले सोबतीला आहेत, कुटुंब सोबत आहे. म्हणून मी या क्षेत्रात पुरस्काराचा मानकरी ठरू शकलो. कदाचित हेच माझ्या पत्रकारीतेचं यश असावं हे मी समजतो. आपल्या अनुभवांच्या भावना व्यक्त करताना काकांचे मन आणि कंठ गहिवरुन आला होता.
खालेक पेंटर : मी अपघाताने राजकारणात गेलो. माझा खरा पिंड हा चळवळीचा असल्याने वाचन आणि लिखनातून मी कायम पत्रकारीता जपली. पन्नास वर्षाच्या सामाजिक, राजकीय, वृत्तपत्र क्षेत्रातील जीवन प्रवास खडतर आणि समाधानकारक राहिला. आज दर्पणकार पुरस्काराने पत्रकार संघाने सन्मानित करुन आमच्या सारख्या ज्येष्ठामध्ये पुन्हा एकदा नवी ऊर्जा निर्माण केली आहे.
गोविंद शेळके : मी कायम तटस्थ पत्रकारीता केली. त्यामुळेे मी कोणत्याही गटाचा नव्हे तर बातमीचा आहे. हेच जपण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला. तर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम वैचारीक दुत पुरस्काराचे मानकरी वृत्तपत्र विक्रेते सुदाम चव्हाण म्हणाले, अत्यंत बिकट परिस्थितीतून मी घडलो. ते केवळ वर्तमानपत्रामुळेच. या क्षेत्रात आल्यामुळे कदाचित मला माझ्या तीनही मुलांना डॉक्टर करण्याची संधी मिळू शकली. हे मी माझे भाग्य समजतो.
मकदूम काझी : चौफेर शेरेबाजी करत सत्कारमूर्तींचे कौतुक करुन पत्रकारांच्या हितासाठी झटणारे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे आमदार व्हावेत आणि ही वेळ फार दूर नाही. वसंत मुंडेंसारखे पत्रकार जर आमदार होऊन सभागृहात गेले तरच पत्रकारांच्या समस्या खर्या अर्थाने मार्गी लागू शकतील असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख, दिलीप खिस्ती, डॉ.गणेश ढवळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ, भंडार्याचे माहिती अधिकारी फहाद काझी, सत्कारमूर्ती संपादिका प्रतिभाताई गणोरकर, डी.एस.कुलकर्णी आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन राहूल गिरी यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी मानले. दर्पणदिन सोहळ्यास पत्रकार बांधव आणि पत्रकार प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.