पिंपळनेर हद्दीतील जरूड नजीक घडली घटना
By MahaTimes ऑनलाइन |
बीड: पिंपळनेर ठाणे हद्दीत मौजवाडी – बाभळखुंटा मार्गावर कार-ट्रैक्टर टॉलीचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाला नाही. हा अपघात सोमवारी रात्री पौने आकराच्या सुमारास घडला.

प्राप्त माहितीनुसार एक ट्रॅक्टर ऊस गाडी घेउन कारखानाकडे जात होता. दरम्यान अंधारात पुढील वाहन न दिसल्याने कार ट्रैक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रैक्टर ट्रॉलीची पाठीमागील दोन्ही चाके निखळून पडली. कारचा समोरील भाग चक्नाचूर झाला. ट्रैक्टर चालकाचे नाव होंडे असल्याचे समजते. सदरील कार कोणाची होती, त्यात कोण बसले होती याविषयी पोलिसांकडे काहीही माहिती नाही.
सदर अपघाताची माहिती मिळताच नाईट पेट्रोलिंग वर असलले पिंपळनेर ठाण्याचे सहायक फौजदार आत्माराम गर्जे, जमादार संजय सुरवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत कोणीतरी जखमींना दवाखान्यात दाखल केले होते. पुढील तपास एपीआय बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
