विविध उपक्रमाचे आयोजन
By MahaTimes ऑनलाइन |
श्री सद्गुरू बंजारा सेवा संघ बीड संचलित, दीनानाथ बालकाश्रम अंथरवणपिंप्री (तांडा) येथे सोमवारी (दि. 26) रोजी ‘वीरबाल’ दिवस विविध उपक्रमासह साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य खंदारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक शिंदे सर, तसेच चव्हाण सर, जाधव पवार ए.आर., पवार आर.एन., अधीक्षक तारडे पी.आर. व्यासपीठावर अग्रस्थानी होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिख धर्मगुरू श्री गुरु गोविंदसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी काही मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली. मुख्याध्यापक शिंदे सर, प्राचार्य खंदारे सर यांनी वीरबाल दिवस का साजरा करायचा त्याचे महत्त्व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले.
याप्रसंगी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक राठोड अमोल प्रकाश याने तर द्वितीय क्रमांक चव्हाण ज्ञानेश्वर प्रभू, तृतीय क्रमांक राठोड सचिन आबासाहेब या विद्यार्थ्यांनी मिळवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे व्ही.एन. तर आभार प्रदर्शन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालकाश्रमाच्या सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
