असाही योगायोग दोन्हीही उप कार्यकारी अभियंता
कार्यवाहीत समान 80-80 हजार रुपए स्वीकारले
बीड : लाचखोरी वर्ष अखेर ही सुरूच असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. हजारो रूपयाची लाच घेतांना दोन बडे अधिकारी लाच लुचपत प्रतिबंक औरंगाबाद विभागाच्या जाळ्यात अडकले. या कारवाईमुळे लाच अधिकारी, कर्मचा-यात खळबळ उडाली आहे. या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात विशेष बाब अशी की लाचखोर अधिका-यांनी एक समान 80-80 हजार रुपयांची लाच स्वीकारली.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील उप कार्यकारी अभियंत्यासह एका खाजगी व्यक्तीवर बीड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 26) दुपारी कारवाई केली. राख वाहतुकीचे गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यास आरोपी लोकसेवक अनिल रामदास वाघ (वय 36, उपकार्यकारी अभियंता, परळ धर्मल पॉवर स्टेशन) यांनी एका गेट पास साठी पाच हजार रूपए प्रमाणे 1 लाख रूपए लाचेची मागणी केली आहे. अशा आशयाची तक्रार दाखल झाली होती. सदर प्रकरणाची शहनिशा केली असता आरोपी लोकसेवक याने तडजोडीअंती तक्रारदाराकडे 4 हजार रूपए या प्रमाणे 20 गेटपास चे 80 हजार रूपए खाजगी व्यक्ती कडे देण्यास सांगितले. आज सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बीड एसीबीने निवासस्थान (कॉर्टर्स) परिसरात सापळा रचून 80 हजार रुपये स्वीकारताना आदिनाथ खाडे याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पुलिस उप अधिक्षक शंकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी,सह अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल धस, पोलिस अंमलदार श्रीराम गिराम,अमोल खरसाडे,भारत गारदे,अविनाश गवळी, वाहन चालक-गणेश म्हेत्रे यांनी केली.
महावितरणच्या अधिका-याने ट्रान्सफॉर्मरसाठी 80 हजार स्वीकारले
जालना : दुसरी मोठी कार्रवाई जालना जिल्ह्यात महावितरणच्या भोकरदन उपविभागात घडली. महावितरण कंपनी चे उप कार्यकारी अभियंता दिपक काशिनाथ तुरे (50 वर्ष ) यांनी तक्रारदार हे इलेक्ट्रिक ठेकेदार आहेत. शेतकऱ्यांसाठी चार गावात इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी त्यांना आरोपी लोकसेवक यांच्याकडून अंदाजपत्रक व कार्यारंभ आदेश ची आवश्यकता होती. हे प्रत्येक काम मंजूर करण्यासाठी प्रत्येकी 20 हजार रु पयाची मागणी करून 80 हजार रु पयाची लाचेची मागणी केली होती. या आशयाची तक्रार दाखल झाल्यानंतर जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 26) ही कार्यवाही केली आहे. ही कार्यवाही स्वत: पोलीस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर यांनी पो.ह. ज्ञानदेव झुंबड पो.ना. ज्ञानेश्वर मस्के पो.ना. कृष्णा देठे, ओ सी गणेश बुजाडे यांनी केली.
या दोन्ही कार्यवाया लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड व जालना युनीटने केल्या.
