1 जानेवारी रोजी आयोजन : राष्ट्रीय उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा
बीड : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारी रोजी नेत्रदान नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील सर्वाधिक पत्रकार व पत्रकार प्रेमी नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून नेत्रदान नोंदणी शिबीर यशस्वी करावे असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
नेत्रदान नोंदणी महाशिबीर संपूर्ण राज्यभरात आयोजित करण्यात आले आहे. पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात शहरामध्ये नेत्रदान नोंदणी शिबीर राबवण्यात येणार आहे. विहित नमुन्यातील नोंदणी फॉर्म इच्छुक नेत्रदान दात्याने भरुन समवेत स्वतःच्या आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे. बीड जिल्ह्यातील पत्रकार आणि पत्रकार प्रेमी जनतेने पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात सम्राट चौक, शाहूनगर कॉर्नर, बीड येथे विहित नमुन्यातील फॉर्म आणि आधार कार्ड 1 जानेवारी पर्यंत जमा करावेत असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार
बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील ज्या पत्रकारांनी अथवा वृत्तपत्र सृष्टीशी निगडीत विविध घटकामध्ये काम करणारे प्रतिनिधी यांनी सहभाग घेऊन जर सरपंचपदी अथवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले असतील अशा बहाद्दर नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी 9822628521 या व्हॉटसअॅप नंबर वर आपली व्यक्तीगत माहिती (वृत्तपत्र, निवडून आलेले गाव, संपूर्ण नाव) पाठवावी. पत्रकारीतेतुन थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात यथोचित सत्कार करुन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.