35 वर्षीय महिलेच्या मेंदूतील क्रिकेटच्या बॉल एवढ्या ट्यूमरची दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अल्पावधीत नावारूपाला आलेल्या बीड शहरातील काकू- नाना मेमोरियल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिटने रुग्णाच्या मेंदूमधील चेंडू एवढ्या मोठ्या ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. ज्या उपचारासाठी बीड जिल्ह्यातील रुग्णांना औरंगाबाद, पुणे, मुंबई याठिकाणी जावे लागत होते. मात्र आता काकू- नाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या सुविधा मिळत असल्याने सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्णांना याचा फायदा होऊ लागला आहे.
गेवराई येथील 35 वर्षीय महिला तीन ते चार वर्षापासून सतत, उलट्या, मळमळ, चक्कर येणे व डोळ्यांची नजर हळूहळू कमी होत असल्याच्या आजाराने त्रस्त होती. त्याचबरोबर हात व पाय देखील उचलत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी नेत्ररोग तज्ञांकडे जाऊन संपर्क केला. त्यांनी न्यूरोसर्जन व स्पाईन सर्जन डॉ. समीर शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. ती महिला काकू -नाना मेमोरियल हॉस्पिटल येथे आली.
यावेळी डॉ. समीर शेख यांनी तपासणी करून एमआरआय करण्यास सांगितले. एमआरआय रिपोर्टमध्ये मेंदूमधील मोठ्या ट्यूमर निघाला व अचूक रोगनिदान झाले. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बीडच्या आरोग्य क्षेत्रात काकू- नाना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्या महिला रुग्णाच्या मेंदूमधील मोठ्या ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी भूल तज्ञ डॉ. श्रीकांत मोराळे, ड्युटी मेडिकल ऑफिसर, डॉ. अशोक यादव, डॉ. उत्कर्ष सोमवंशी, डॉ. अश्विनी बहिर, डॉ. शुभम, डॉ. विकास राठोड, फिजिओथेरपिस्ट डॉ. सुरज मनसबदार तसेच ओटी असिस्टंट म्हणून रावसाहेब गिरी, प्रणव सपकाळ या सर्व टीमने अथक परिश्रम करून यशस्वीरित्या शस्त्रक्रिया होण्यास मदत केली.
सर्व शस्त्रक्रिया सुव्यास्थित पार पडण्या साठी वैद्यकीय संचालक डॉ. विठ्ठल सर्जेराव आळणे व प्रशासकीय अधिकारी, सय्यद बशीर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आता सर्व रुग्ण व्यवस्थित रित्या असून त्याचे दैनंदिन कार्य करत आहे. याचा नातेवाईकांना खूप खूप मनस्वी आनंद होत आहे. नातेवाइकांनी हॉस्पिटलचे अध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर, संचालक डॉ. बालाजी जाधव, अजित वरपे. न्यूरोसर्जन व स्पाईनसर्जन डॉ. समीर शेख यांचे आभार मानले.