गेवराई विधानसभा मतदारसंघात ७६ ग्रामपंचायत पैकी ५१ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला
By MahaTimes ऑनलाइन |
गेवराई : गेवराई विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार अमरसिंह पंडित आणि माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली एकूण ७६ ग्रामपंचायत पैकी ५१ ग्रामपंचायतीवर आणि माळापुरी, पिंपळनेर सर्कलमधील ९ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला असून भाजपा आणि शिवसेनेला बाजूला सारत ग्रामीण मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीच्या प्रारंभीच वडगाव ढोक ग्रामपंचायतीने विजयी सलामी देत खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या फेरी पासून शेवटच्या फेरी पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची विजयी घौडदौड सुरु झाली. विजयी झालेल्या सरपंच आणि सदस्यांनी कृष्णाई येथे येऊन विजयी जल्लोष केला. ग्रामपंचायत तो झॉंकी है जि.प. पं. स. आणि विधानसभा और बाकी है … अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले असून ग्रामीण मतदारांनी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रंचड उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सर्व विजयी सरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करुन विजयी जल्लोष केला.
गेवराई विधानसभा मतदारसंघात रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजता पंचायत समिती गेवराई येथे दहा टेबलावर एकूण नऊ फेरीत झाली. पहिल्या फेरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वडगाव ढोकच्या माध्यमातून विजय मिळवत खाते उघडले.
पहिल्या फेरीत वडगाव ढोक ( सरपंचपदी सौ.आशाबाई ढाकणे विजयी), ( सरपंचपदी सौ.मनिषा साठे विजयी) खडकी टाकळगव्हाण( सरपंचपदी सौ. मनिषा बाळासाहेब साठे विजयी), काजळा, मालेगांव बू, (सरपंच पदासाठी बबन गोरकर विजयी), पांचाळेश्वर, कूंभेजळगाव ग्रामपंचायतीवर अमरसिंह पंडित गटाने वर्चस्व सिद्ध केले दरम्यान मतमोजणीच्या प्रारंभीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी मुसंडी मारली आणि भाजपा सेनेचा धुव्वा उडाला. कृष्णाई निवासस्थानी विजयी उमेदवार जल्लोष करत असून माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित रणविर पंडित यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
एकूण ७६ पैकी ५० ग्राम पंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून ग्रामीण भागातील मतदारांनी अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या बाजूने कौल दिला आहे.
पिंपळनेर बहिरवाडी सर्कल मध्ये पंडित गटांचे वर्चस्व
बीड तालुक्यातील आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातील बहिरवाडी आणि पिंपळनेर सर्कल मधील माळापुरी, कामखेडा आणि लिंबारुई, खामगाव, लोळदगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले. माळापुरी ( सरपंच पदी अशोक ढास विजयी), कामखेडा ग्रामपंचायतीवर सरपंचपदी शेख बिलाल आणि लिंबारुईच्या सरपंचपदी रामचंद्र सोनवळ हे विजयी झाले. नबाबपुर हवेली(सरपंच पदी विजयी), लोणी शहाजानपुर (सरपंच पदी महहादेव प्रभाळे विजयी), सुर्डी (सरपंच पदी विलास मोरे विजयी), लोळदगाव ( सरपंच विजयी) बेलापूरी ( सरपंच विजयी), खामगाव /नांदूर/पारगाव जप्ती / हिंगणी हवेली ग्रामपंचायत सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शाहिद पटेल विजयी झाले. पेंडगाव(सरपंच पदी सौ.अलका पवार विजयी ) अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या
दैठणच्या सौ. प्रेरणा प्रताप पंडित विजयी
दैठण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सौ.प्रेरणा प्रताप पंडित विजयी झाल्या. विद्यमान मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या सौ. प्रेरणा प्रतापसिंह पंडित यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनल मधून निवडणूक लढवून शिवसेनेच्या उमेदवार सौ. शुभांगी निळकंठ पंडित यांचा पराभव करून ३५२ मतांनी विजयी झाल्या आहेत. दैठण ग्रामपंचायत ही पुर्वी अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात होती. प्रताप पंडित हे सरपंच होते. पुन्हा त्यांच्या पत्नी सरपंचपदी विराजमान झाल्या आहे. सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला. यावेळी अमरसिंह पंडित, प्रताप पंडित, चंदुकाका पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित आणि कार्यकर्ते विजयी जल्लोषात सहभागी झाले होते.