By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शौकतुल्लाह हुसैनी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शफी अहमद हाश्मी होते. प्रमुख अतिथी प्रा. शफी हाश्मी यांनी अल्पसंख्याक समाजाला भारतीय नागरिक म्हणून काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, राज्यघटनेत दिलेल्या अधिकाराचा वापर अल्प प्रमाणात होत आहे.
त्यांनी अल्पसंख्यांक दिन का साजरा केला जातो याबद्दल सांगितले. अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, शिख, जैन, बौद्ध या समाजाचा समावेश होतो या समाजाला शैक्षणीक क्षेत्रात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देण्यात आल्या पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. शौकतुल्ला हुसैनी यांनी अल्पसंख्यांक हक्क दिवस फक्त साजरा करून भागणार नाही तर त्यासाठी सर्व अल्पसंख्यांकाने शासनाच्या योजनासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे त्यासाठी विविध योजनांची माहिती व अंमलबजावणी कशी करता येईल याविषयी सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष डॉ. शेख अब्दुल रहीम यांनी तर आभार पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रा.फरीद अहमद नहरी यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. शेख गफूर अहमद, डॉ. मोमीन रईस, डॉ. शामल जाधव तसेच सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.मोहम्मद इलयास फाजील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.