अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करून योजनांची अंमलबजावणी करा : लोकसेना
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी आपल्या विविध मागण्यांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे निवेदन सादर करुन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पुढील बैठकीत विविध विषयाची चर्चा करण्याची मागणी केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक इम्रान काद्री, डॉ. शेरखान ॲड शेख शफिक, शेख वजीर चॉदसासहाब, शेख मुनीर, कौसर खान, इलियास इनामदार, जेबा अबदुल कदीर शेख, सुफियान मनियार तसेच शिवशंकर मुंडे, पुनम वाघमारे व विविध शासकिय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करून योजनांची अंमलबजावणी करा : लोकसेना
अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती, पंतप्रधानाच्या १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी तसेच स्थानिक अल्पसंख्यांक समाजचे समस्या सोडवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती स्थापन केली जाते. दुर्दैवाने आजपर्यंत बीड जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती गठीत करण्यात आली नाही. शासन व प्रशासन अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांसंबंधी उदासीन आहे. केंद्र व राज्य शासनाकडून अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात परंतू सर्व योजनांची अंमलबजावणी फक्त कागदावरच होत आहे.
परळी शहरात अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह मंजूर होऊन तब्बल सात वर्ष होत आहे परंतू अजून वस्तीगृहाचे काम पूर्ण झाला नाही. बीड शहरात उर्दु घर मंजूर होऊन 6 महिने झाले तरी प्रशासन काही कार्यवाही करत नाही, जूनी तहसिलच्या जागेवर उर्दु घर तयार करा. फारसी व उर्दू भाषेतील महसूली कागदपत्रे मराठी भाषांतर करण्यासाठी जाणकार कर्मचारी नियुक्त करा, जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर समिती गठीत करण्याचे व इतर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी लोकसेना संघटना प्रमुख इलियास इनामदार, बीड जिल्हाध्यक्ष सुफियान मनियार यांनी केली.