पुण्यातील मोशीत भरलेय भारतातील सर्वात मोठे किसान प्रदर्शन
By MahaTimes ऑनलाइन |
पुणे : भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय ‘किसान’ कृषि प्रदर्शन पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे (14 ते 18 डिसेंबर) सुरू आहे. या किसान प्रदर्शनात सरकारच्या कृषी मंत्रालयासह शेकडो कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक सहभागी झाल्या आहेत. यात बीड येथील नामांकित गणराज उद्योगसमूहाच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय कृषि प्रदर्शन आणि संमेलन केंद्र मोशी येथे हे प्रदर्शन सुरू असून आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील नवे विचार शेतकऱ्यापर्यंत पोहोचिवणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषि निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा, नर्सरी, शेती लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्याना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे.
पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या 100 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे. रविवारी (18 डिसेंबर) रोजी कृषि प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. पाच दिवसीय प्रदर्शनामध्ये देशभरातून हजारोंच्या संख्येत प्रगतिशिल शेतकरी भेट देत आहेत. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्पार्क या दालनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील 10 स्टार्टअप्सना किसान प्रदर्शनात त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदिर्शत करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून यातून नवउद्योजकांना शेतीशी निगिडत नवीन संकल्पना मांडण्यात आली आहे.
‘गणराज’ स्टॉलला हजारों शेतकरी व व्यापारी बांधवांनी दिली भेट
किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य आणि शेती क्षेत्रातील मान्यवर संस्था यांचा सक्रीय सहभाग नोंदविला आहे. पाण्याचे नियोजन आणि सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या 80 हून अधिक आस्थापनांचा सहभाग, हे कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरले आहेत. या आंतरराष्ट्रीय किसान प्रदर्शनात गणराज उद्योगसमूहाच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्यासह देशभरातील शेतकरी व व्यापारी बांधवांनी ‘गणराज’ स्टॉलला भेट दिली. दरम्यान माहिती देताना कंपनीचे संचालक संदीप उपरे सह समूहांचे प्रतिनिधी दिसत आहेत. सदरील प्रदर्शन हे रविवार पर्यंत चालू आहे. सर्व शेतकरी बांधवांनी आणि व्यापार्यांनी प्रदर्शनात येऊन स्टॉलला सदिच्छा भेट द्यावी असेही आवाहन यावेळी समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
