एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने लवकरच गौरविण्यात येणार
By MahaTimes ऑनलाइन |
औरंगाबाद : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्यातील पत्रकारांना एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने यावर्षीचा राज्यस्तरीय ‘जीवन गौरव’ पुरस्कार दै. मराठवाडा साथीचे बीड जिल्हा प्रतिनिधी ॲड. संदीप बेदरे यांना जाहीर करण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात प्रतिष्ठित मान्यवराच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ट सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ॲड. संदीप बेदरे यांनी पत्रकारिते सोबतच सामाजिक कार्यामध्ये मोठे योगदान दिले असून श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक तथा प्रणेते, महाराष्ट्र सुवर्णकार (सोनार) कर्मचारी महासंघाचे संस्थापक प्रांताध्यक्ष, महाराष्ट्र सुवर्णकार युवा मंच संस्थापक, राष्ट्रीय सत्यशोधक समाज ओबीसी परिषद राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, संचालक सोनार समाज महामंडळ बारामती, जि. पुणे, सदस्य- अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ, मुंबई, अजीवन मानद सदस्य मनुष्यबळ लोकसेवा विकास अकादमी, मुंबई, सल्लागार- ओबीसी संघर्ष कृती समिती अशा असंख्य पदांवर विराजमान असून पत्रकारिते सोबतच सामाजिक संघटनांमध्ये सदैव कार्यरत असतात.
त्यांच्या या सर्व गुण संपन्न कार्य यासाठीच हा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी सांगितले आहे.
ॲड. बेदरे यांना यापूर्वी विविध राज्य, राष्ट्रस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले
पत्रकार ॲड. संदीप बेदरे यांना यापूर्वी राष्ट्रीय स्नेही विकास मंडळ ट्रस्ट बीड यांच्यावतीने सामाजिक कृतज्ञता नोंद गौरव पुरस्कार सन २००४, मनुष्यबळ लोकसेवा विकास अकादमी मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र गुणीजनरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार, अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्र लेखक संघ मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप सन २००६, दै. मराठवाडा साथीचा उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार सन २००६, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच्या वतीने सेवा गौरव पुरस्कार सन २००६, भारतीय समाज विकास अकादमी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रदर्पन हा राष्ट्रीय पुरस्कार सन २००७, चेतना पब्लिकेशन्स जळगांव यांच्या वतीने चेतना गौरव पुरस्कार, स्मृती प्रतिष्ठाण औरंगाबाद यांच्या वतीने नाना शंकरशेठ स्मृती पुरस्कार सन २००८, बीड नगर परिषद आणि परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिभा – २००८ पुरस्कार, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ, जिल्हा बीडच्या वतीने कुंभार मित्र पुरस्कार सन २००८, दै. मराठवाडा साथीच्या वतीने विशेष गौरव पुरस्कार सन २००८, जय माता दी मित्र मंडळ व महिला मंडळ शनिमंदिर बीड यांच्या वतीने पत्रकार भूषण पुरस्कार सन २००८, इन्फंट इंडिया संस्थेतर्फे आरोग्य भुषण पत्रकारीता पुरस्कार सन २००९, महाराष्ट्र शासनाच्यावतीने महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम पत्रकारीता राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय आठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेले असून सोनार समाज सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य, शाखा परभणीच्यावतीने सोनार समाज रत्न पुरस्कार सन २००९ अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
