पठाण अमरजान यांचे निवेदन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : 18 डिसेंबर जागतीक अल्पसंख्याक हक्क दिनी आयोजित कार्यक्रमात अल्पसंख्याक प्रतिनिधींना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी द्यावी अशी मागणी पठाण अमरजान यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

जागतीक स्तरावर अल्पसंख्याकांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व अल्पसंख्यांकाचा विकास व्हावा या हेतूने दि.18 डिसेंबर हा दिन जागतीक स्तरावर अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या देशात केंद्र व राज्य सरकारच्यावतीने अल्पसंख्याक आयोग, विविध शासकीय विभाग व शासकिय संस्थाच्या वतीने प्रशासकीय स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन देशातील मुस्लीम, क्रीश्चन, बौध्द, पारसी, जैन इ. समुदायांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जाते. दि.18 डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातही मोठया उत्साहाने विविध क्षेत्रातील अल्पसंख्याच्या प्रतिनिधींच्या उपस्थीतीत प्रशासकीय स्तरावर कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अथवा आदर्श शिक्षकांचे सत्कार असे व इतर कोणतेही कार्यक्रम न घेता या कार्यक्रमात अल्पसंख्यांकाच्या विकासावर, अल्पसंख्याकांच्या हक्कांवर व अल्पसंख्याकाच्या विविध मागण्यावर जास्ती जास्तभर देवुन केंद्र व राज्य सरकार कडुन येणाऱ्या अल्पसंख्याक विकास निधीचा कोठे व कसा वापर झाला याचा आढावा घेवुन या कार्यक्रमाचे हेतू साकार करण्यात यावे.
त्याच प्रमाणे 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिनी निमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हयाभरातून येणाऱ्या विविध क्षेत्रातील अल्पसंख्याक प्रतिनिधींना त्यांचे मागण्या मांडण्याची अथवा मनोगत व्यक्त करण्याची जास्तीत जास्त संधी देण्यात यावी अशी मागणी पठाण अमरजान यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. दयानंद जगताप यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
