भारतीय जैन बँक व रोटरी क्लब चे आयोजन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : गुडघेदुखी, पाठदुखी, हाडांचा ठिसूळपणा यामुळे अनेक जण त्रस्त असून त्याच्यावर योग्य उपचार व्हावा, सल्ला मिळावा याकरिता भारतीय जैन बँक, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ बीड यांच्या वतीने पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संचालक डॉ.पराग संचेती यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आज रविवार दि.11 रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार्या या शिबीराच्या पार्श्वभूमीवर डॉ. पराग संचेती व डॉ.प्रमोद भिलारे यानी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी डॉ.संचेती म्हणाले, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखीचे रुग्ण वाढत आहेत. हे आजार जडल्यानंतर त्यावर उपचारही उपलब्ध आहेत. परंतु ते होणार नाहीत याकरिता योग्य आहार व व्यायाम यावर भर देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. पराग संचेती यांनी केले. हाडाच्या समस्या व त्यावर प्रभावी व अत्याधुनिक पद्धतीने उपचारासाठी पुणे येथे नवे हॉस्पिटल उभारले जात आहे. या माध्यमातून रु ग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. बहतांश वेळा ऑपरेशननंतर संसर्गाचा धोका असतो, तो टाळण्यासाठीही या रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आज होणार्या शिबीरामध्ये रुग्णांची तपासणी व गरज भासल्यास पुणे येथे शस्त्रक्रि या केल्या जाणार आहेत. त्या रुग्णांना शुल्कामध्ये सवलत दिली जाणार आहे असे डॉ. पराग यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ बीड, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.दरम्यान डॉ. संचेती यांचा डॉ. प्रमोद शिंदे यांनी सत्कार केला.