शांतता, शिस्त अन संयमाचा संदेश, 10 हजारांवर स्वयंसेवक कार्यरत
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आजच्या धकाधकीच्या युगात माणसातील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत आहे. प्रत्येकाने प्रेम व माणुसकी जोपासणे आवश्यक असून, विश्वशांतीची गरज आहे. मानव कल्याणासह विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचार्यांचा संदेश देण्याबरोबर कुरआनच्या शिकवणीचा प्रसार व्हावा यासाठी बीड शहरा लगतच्या तळेगाव परिसरात आयोजित इज्तेमात गुरुवारी पहिल्याच दिवशी जवळपास 75 हजारांपेक्षा अधिक समाजबांधवांनी उपस्थिती लावली.
कोविडच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय इज्तेमा संपन्न होत आहे, त्यासाठी 150 एकरावर व्यवस्था करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासून इस्लामचे अभ्यासक, धर्मगुरू कुरआन, हदीसवर बयाण (प्रवचन) करीत आहेत. सायंकाळी 6 वाजेपर्यंत इज्तेमास्थळी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित झाल्याने परिसर गर्दीने फुलला आहे. आपल्यामुळे इतरांची गैरसोय होऊ वाहतूक कोंडी होणार नाही. नये, यासाठी बीड शहरापासून इज्तेमास्थळापर्यंत जागोजागी स्वयंसेवक उभे आहेत. प्रत्येक वाहनधारकांना मार्ग दाखविण्याचे काम करीत सावकाश जाण्याचा सल्ला देणारे तरु ण प्रेम आणि आपुलकी दाखवित आहेत. इज्तेमास्थळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे.
शिवाय, उपस्थित बांधवांना अत्यंत माफक दरात दर्जेदार जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली आहे. इज्तमास्थळी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ व मेवा मिठाई, उबदार कपड्याची अनेक दुकाने थाटली आहेत. अत्तर, सुरमा, टोपीची ही दुकाने आहेत. शिवाय, इज्तेमास्थळी घेऊन जाण्यासाठी बीड शहरातील बसस्थानक, बार्शीनाका सह शहराच्या विविध विभागात मोफत वाहनाची सोय करण्यात आली आहे.
दवाखाना, मेडीकलची सोय
इज्तेमास्थळी दवाखाना सुरू केला आहे. शिवाय मेडीकल, रु ग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरही सेवा देत आहेत. हजारो नागरिक उपस्थित असतानाही कोणालाही त्रास होणार नाही, यासाठी शेकडो स्वयंसेवक काळजी घेण्याचे काम करीत आहेत.
शहरात अनेक पार्किंग नियंत्रण ऑफिस
शहरातील शिवाजी चौक, अहमदनगर रोड, बालेपीर पुलिस पंप, बार्शीनाका, जालना रोड सह अनेक ठिकाणी पार्किंग नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत. ते कडाक्याच्या थंडीत ही आपली डयूटी चोख बजावत आहेत. ट्रैफिक जाम होउ नये याची काळजी घेत आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी पार्किंग नियंत्रण ऑफिस व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.