कठोर मेहनत, जिद्दीच्या बळावर मिळविले यश
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : निरंतर अभ्यास, जिद्द व चिकाटीच्या बळावर रोशनी मुबारक शेख ने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात उत्तम गुण प्राप्त करून सतत प्रथम येण्याचा मान मिळवला. आता अवघड समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा (नीट) मध्ये ही पहिल्याच प्रयत्नात चांगल्या गुणांनी उर्त्तीण झाली असुन तिचा व्ही.आर.के. महिला वैद्यकीय महाविद्यालय, हैदराबाद येथे एमबीबीएसला नंबर लागला असुन तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
बीड तालुक्यातील पाली येथील रहिवाशी व बीड येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. मुबारक शेख व जिल्हा रूग्णालयातील येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी (आयुष) डॉ. निखत शेख यांची मुलगी रोशनी मुबारक शेख हिचा व्ही.आर.के. महिला वैद्यकीय महाविद्यालय, हैदराबाद येथे एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित झाला आहे.
रोशनी मुबारक शेख ही प्राथमिक शिक्षणापासुनच एक हुशार विद्यार्थीनी म्हणून नावलोकिक मिळविला आहे. तिचे प्राथमिक शिक्षण सीबीएससी पैटर्न ने ज्ञानेश्वर पब्लिक स्कुल, बीड येथे झाले. तर दहावी परीक्षेत सीबीएससी पैटर्न ने शाळेत सर्वप्रथम तर जिल्ह्यात सर्व तृतीय येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तर तिचे 11 वी-12 वी उच्च माध्यमिक चे शिक्षण अंजुमन ईशाअत ए तालीम संचिलत मिल्लीया कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. दहावी नंतर बारावी परीक्षेत ही मेरीटचे गुण प्राप्त करून तिने आपली योग्यता सिध्द केली आहे. कोविड काळात शिक्षण प्रभावित झाले होते मात्र तिने कठोर जिद्द व मेहनतीच्या बळावर एमबीबीएस प्रवेश पूर्व परीक्षेत देखील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. तिचा व्ही.आर.के. महिला वैद्यकीय महाविद्यालय, हैदराबाद येथे पहिल्या यादीत पहिल्या क्रमांक ने एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित झाला आहे. एमबीबीएस मध्ये ही सर्वप्रथम येण्याचा तिचा माणस आहे.पाली (ता. बीड) सारख्या ग्रामीण भागातुन एमबीबीएस होणारी बहुदा ती पहली मुलगी ठरणार आहे.
या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सलीम बिन अहेमद, सचिव खान सबीहा बेगम, प्राचार्य सय्यद अब्दुल सत्तार, डॉ. शेख समीर, डॉ. फैसल चाऊस, प्रा. जावेद पाशा, सय्यद अब्दुल रज्जाक आणि सर्व शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सर्वांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.